बीड प्रतिनिधी - स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकरांची राष्ट्रभक्ती ,त्यांनी निर्माण केलेली साहित्य संपदा , सामाजिक समरसतेसाठी केलेले प्रयत्न, आ
बीड प्रतिनिधी – स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकरांची राष्ट्रभक्ती ,त्यांनी निर्माण केलेली साहित्य संपदा , सामाजिक समरसतेसाठी केलेले प्रयत्न, आणि अखेरच्या श्वासापर्यंत राष्ट्रभक्तीचा केलेला जागर हा समाजासाठी आदर्श आहे.
स्वातंत्र्यवीरांवर केले जाणारे आरोप आणि वारंवार त्यांचा करण्यात येत असलेला अपमान त्याला उत्तर देण्यासाठी, भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेच्या वतीने सावरकर गौरव यात्रेचे आयोजन करण्यात आले असून बीड शहरातील सावरकर गौरव यात्रा ऐतिहासिक ठरेल असा विश्वास भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांनी व्यक्त केला आहे. स्वातंत्र्यवीर सावरकरांचा वारंवार अपमान करण्याचा प्रयत्न होत आहे.त्यांनी केलेले कार्य महान आणि आदर्शवादी आहे.साहित्यिक म्हणून त्यांचे योगदान मोठे आहे. सावरकरांना अभिवादन ,विचारांचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी ,6 एप्रिल रोजी बीड शहरात सावरकर गौरव यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे.अशी माहिती भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांनी शासकीय विश्रागृह येथे झालेल्या पत्रकार परिषदेत दिली. 6 एप्रिलिल रोजी बीड शहरातून निघणार्या सावरकर गौरव यात्रेत सर्वांनी सहभागी होऊन आपले प्रेम व्यक्त करावे असे आवाहन मस्के आणि खांडे यांनी केले आहे. या पत्रकार परिषदेस शिवसेनेचे जिल्हाप्रुख कुंडलिक खांडे, भाजपाचे सर्जेराव तांदळे, प्रा. देविदास नागरगोजे, विक्रांत हजारी, नवनाथ शिराळे, शिवसेनेचे चंद्रकांत नवले, बालाजी पवार आदी उपस्थितीत होते.
COMMENTS