‘यूपी’त भाजपला हादरे ; तिसर्‍या कॅबीनेट मंत्र्याचा राजीनामा

Homeताज्या बातम्यादेश

‘यूपी’त भाजपला हादरे ; तिसर्‍या कॅबीनेट मंत्र्याचा राजीनामा

लखनऊ : उत्तरप्रदेशात भाजपला चांगलेच हादरे बसतांना दिसून येत असून, कॅबिनेट मंत्री स्वामी प्रसाद मौर्य यांच्या राजीनाम्यानंतर अनेक मंत्र्यांनी राजीनामा

समाजाशी दगाफटका केल्यास जड जाईल
आसाममधील गुवाहाटी मध्ये रस्ता अपघातात ७ इंजिनियर विद्यार्थ्यांचा मृत्यू
वादानंतर मुलीची गळा दाबून हत्या

लखनऊ : उत्तरप्रदेशात भाजपला चांगलेच हादरे बसतांना दिसून येत असून, कॅबिनेट मंत्री स्वामी प्रसाद मौर्य यांच्या राजीनाम्यानंतर अनेक मंत्र्यांनी राजीनामा देण्यास सुरूवात केली असून, गुरूवारी भाजपचे तिसरे कॅबिनेट मंत्री धर्म सिंह यांनी राजीनामा दिला आहे. धर्म सिंह सैनी यांच्या आधी औरैयामधील बिधुना चे आमदार विनय शाक्य आणि फिरोजाबादमधील शिकोहाबादचे आमदार मुकेश वर्मा यांनी स्वामी प्रसाद मौर्य यांना पाठिंबा देत राजीनामे दिले. आमदार बाला प्रसाद अवस्थी यांनीही राजीनामा दिला आहे. गुरूवारी दुपारपर्यंत भाजपच्या 1 मंत्री आणि 3 आमदारांनी राजीनामे दिले आहेत.

COMMENTS