अहमदनगर/प्रतिनिधी ः महानगरपालिकेच्या सभेत अनेक वादग्रस्त विषयांवर चर्चा होवून निर्णय होणार असल्यामुळे या सभेकडे नगरकरांचे विशेष लक्ष असतांना, या

अहमदनगर/प्रतिनिधी ः महानगरपालिकेच्या सभेत अनेक वादग्रस्त विषयांवर चर्चा होवून निर्णय होणार असल्यामुळे या सभेकडे नगरकरांचे विशेष लक्ष असतांना, या सभेला महानगरपालिकेतील चालक विना उभी असलेली विविध वाहनांच्या कारणावरून सभेची सुरुवात जोरदार झाली या सभेत भाजप व शिवसेना नगरसेवक एकमेकांना थेट भिडण्याचा प्रकार मंगळवारी समोर आला.
बांधकाम विभागातील बोगस टेस्ट रिपोर्ट, मुख्य जलवाहिनीवर टॅब देणे आदी वादग्रस्त विषयांच्या पार्श्वभूमीवर महापालिकेची सभा वादग्रस्त ठरली. सभेच्या सुरूवातीलाच महापालिकेची बिघडलेली विविध वाहनांचा विषय उपस्थित करत प्रशासनाला धारेवर धरण्यात आले. महापालिकेकडे पोकलेन, जेसीबी असे विविध वाहने आहेत. मात्र ते गेल्या अनेक दिवसांपासून उभी आहेत. त्या ऐवजी ठेकेदारांच्या वाहनांकडून कामे करून घेऊन त्यांना देयके अदा केली जातात. हा मुद्दा नगरसेवक शाम नळकांडे यांनी उपस्थित करत वाहने अद्याप उभी का, असा प्रश्न केला. उपायुक्त यशवंत डांगे यांनी वाहन चालकासाठी निविदा काढूनही त्यास प्रतिसाद मिळाला नसल्याचे सांगितले. मात्र त्यावर समाधान न झाल्याने नगरसेवक आक्रमक झाले. नालेसफाई व इतर कामांसाठी आपली वाहनेच वापरावीत, अशी मागणी केली. वाहनास चालक मिळत नाहीत, हे कारणच होऊ शकत नाही. मागील सभेतच ही वाहने चालू करू, असे सांगण्यात आले होते. चौकाचौकात वाहन चालक असताना तुम्हालाच कसे मिळत नाहीत, असा सवाल कुमार वाकळे यांनी केला. आठ महिन्यांपासून वाहने जागेवर उभी असताना ठेकेदारांकडून नालेसफाई केली जाते, हे महापालिकेचे नुकसान नाही का? याची जबाबदारी निश्चित करून संबंधितांवर कारवाई करा, अशी मागणी नळकांडे यांनी केली. आपल्याकडील पोकलेन त्या क्षमतेचे नसल्याचे अभियंता रोहिदास सातपुते यांनी सांगताच नगरसेवक संतापले. जे क्षमतेचे नाही, ते खरेदी कशाला केले, असा प्रतिप्रश्न करत धारेवर धरले. प्रत्येकवेळी वाहन चालक मिळत नाही, असे उत्तर दिले जाते. दरवेळी पावसाळा तोंडावर आल्यावर प्रशासनाला जाग येते. जे अधिकारी सभेला हजर नाहीत, त्यांचा एक महिन्याचा पगार देऊ नका, अशी मागणीही. यावेळी नगरसेवकांनी केली. सभा सुरू झाल्यानंतर दुपारपर्यंत सभेसाठी अतिरिक्त आयुक्त डॉ. पठारे, उपायुक्त कुरे यांच्यासह वित्त अधिकारी, घनकचरा प्रमुख आदी प्रमुख अधिकारी सभेस नव्हते.
COMMENTS