Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

भाजपचे खासदार उन्मेष पाटील अखेर ठाकरे गटात दाखल

मुंबई:  ऐन लोकसभा निवडणुकांच्या तोंडावर भाजपचे जळगावचे विद्यमान खासदार उन्मेष पाटील यांनी भाजपची साथ सोडत उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा हात धरला आह

बंगालमध्ये दुर्गा विसर्जनावेळी बॉम्ब हल्ला; अनेकजण जखमी
मुंबई महानगरपालिका रुग्णालयात भूमिगत कचरा पेट्या बसवणार
सनफार्मा आगीतील दोषींवर गुन्हे दाखल करा- मंत्री कड़ू

मुंबई:  ऐन लोकसभा निवडणुकांच्या तोंडावर भाजपचे जळगावचे विद्यमान खासदार उन्मेष पाटील यांनी भाजपची साथ सोडत उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा हात धरला आहे. त्यांनी आज मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरेंच्या हस्ते हाती शिवबंधन बांधून घेतलं. उन्मेष पाटलांचा शिवसेना पक्ष प्रवेश हा भाजपसाठी मोठा धक्का मानला जात आहे. भाजपने यंदाच्या निवडणुकीत उन्मेष पाटलांचं तिकीट कापल्याने ते नाराज होते, त्यामुळे त्यांनी भाजपला रामराम ठोकला, असं म्हटलं जात आहे. जिथे आत्मसन्मान राखला जात नाही, तिथे थांबण्यात काही अर्थ नाही, असं उन्मेष पाटील म्हणाले. उन्मेष पाटील आपल्या समर्थकांसह मातोश्रीवर पोहोचले. त्यानंतर मातोश्रीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते उन्मेष पाटलांनी हाती शिवबंधन बांधून घेतले. यावेळी खासदार संजय राऊतही तिथे उपस्थित होते.

COMMENTS