Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

भाजपचे खासदार डॉ. भागवत कराडांचा पाय खोलात

अवघ्या वर्षभरापूर्वीच्या मुलाच्या कंपनीला 4 हजार 700 कोटींचे कंत्राट मिळून दिल्याचा ठपकाछत्रपती संभाजीनगर : भाजप नेते तथा माजी मंत्री डॉ. भागवत कर

छ.संभाजीनगर महापौरपदी भाजपचे समीर राजूरकर
संभाजीनगरमध्ये अल्पवयीन मुलीची आत्महत्या
जिल्ह्यातील औद्योगिक क्षेत्राला कुशल मनुष्यबळ उपलब्धतेसाठी अद्यावत कौशल्य प्रशिक्षण- कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा
Bhagwat Karad

अवघ्या वर्षभरापूर्वीच्या मुलाच्या कंपनीला 4 हजार 700 कोटींचे कंत्राट मिळून दिल्याचा ठपका
छत्रपती संभाजीनगर : भाजप नेते तथा माजी मंत्री डॉ. भागवत कराड यांच्यावर गंभीर स्वरूपाचे आरोप करण्यात आले आहेत. त्यांच्या मुलाच्या अवघ्या एका वर्षापूर्वी स्थापन झालेल्या कंपनीला तब्बल 4 हजार 700 कोटी रुपयांचे कंत्राट मिळवून दिल्याचा ठपका सामाजिक कार्यकर्त्या जयश्री खाडिलकर यांनी ठेवला आहे. संबंधित कंत्राट जायकवाडी धरणावर उभारण्यात येणार्‍या तरंगत्या सौरऊर्जा प्रकल्पाशी संबंधित असल्याचे सांगितले जात आहे.
डॉ. कराड यांनी यापूर्वी जायकवाडी धरणाच्या पाण्यावर सौरपटल उभारून 1 हजार 341 मेगावॉट क्षमतेची वीजनिर्मिती करण्याच्या प्रकल्पाला पाठिंबा दर्शवला होता. त्यांच्या सुपुत्र वरुण कराड हे ‘एलएनके ग्रीन एनर्जी प्रायव्हेट लिमिटेड’ या कंपनीत भागीदार असल्याची माहिती आहे. या कंपनीने राज्यात सौरपटल निर्मिती क्षेत्रात 4 हजार 700 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यासाठी राज्य शासनाशी सामंजस्य करार केला आहे. या गुंतवणुकीतून सुमारे 2 हजार 500 जणांना रोजगार उपलब्ध होईल, असा दावा करण्यात आला आहे. विदेशात पार पडलेल्या आर्थिक परिषदेदरम्यान या करारावर स्वाक्षर्‍या झाल्याचे सांगितले जाते. त्यानंतर शेंद्रा औद्योगिक वसाहतीत सुमारे 63 एकर जागा देण्याबाबत हालचाली सुरू असल्याची चर्चा आहे. या पार्श्‍वभूमीवर जयश्री खाडिलकर यांनी सामाजिक माध्यमावरील लेखनातून गंभीर प्रश्‍न उपस्थित केले आहेत. जयश्री खाडिलकर यांनी आपल्या प्रतिक्रियेत म्हटले आहे की, भागवत कराड यांची राज्यसभेवर अचानक नियुक्ती करण्यात आली. त्यामागे पक्षांतर्गत राजकीय समीकरणे कारणीभूत होती का, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. पुढे त्यांना केंद्रात राज्यमंत्रीपद देण्यात आले आणि वीजविषयक समितीवरही स्थान मिळाले, असे त्या म्हणाल्या. अलीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने परदेश दौर्‍यात विविध उद्योग करार केले. त्यामध्ये एलएनके ग्रीन या कंपनीशी झालेल्या 4 हजार 700 कोटी रुपयांच्या कराराचाही समावेश असल्याचे त्या नमूद करतात. जायकवाडी धरणावर तरंगते सौरपटल उभारण्याच्या या प्रकल्पामुळे मोठी गुंतवणूक होणार असल्याचा दावा करण्यात आला आहे.

COMMENTS