Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

भाजप आमदार राजेंद्र पाटणी यांचं निधन

५९ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

मुंबई प्रतिनिधी - वाशिम जिल्ह्यातील कारंजा विधानसभा मतदारसंघाचे भाजपा आमदार राजेंद्र पाटणी यांचे दीर्घ आजारामुळे आज निधन झालं. ५९ वर्षीय राजेंद

लोकसभा निवडणुकीसाठी भरारी पथके तयार
हवामान बदलाच्या प्रश्‍नांवर कृती करण्याची गरज :सचिव नरेश पाल गंगवार
बालाघाटवर पाच प.स. गणातील मतदारांचा एकमुखी पाठिंबा

मुंबई प्रतिनिधी – वाशिम जिल्ह्यातील कारंजा विधानसभा मतदारसंघाचे भाजपा आमदार राजेंद्र पाटणी यांचे दीर्घ आजारामुळे आज निधन झालं. ५९ वर्षीय राजेंद्र पाटणी हे गेल्या दोन-तीन वर्षांपासून आजारी असल्याची माहिती मिळत आहे. मुंबईमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होते. आज त्यांची प्राणज्योत मावळली. पाटणी यांच्या निधनानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शोक व्यक्त केला आहे. सकाळी आमदार राजेंद्र पाटणी यांचे मुंबई येथे उपचारादरम्यान निधन झाले. त्यांच्या दोनही किडण्या फेल झाल्या होत्या. गेल्या दोन ते तीन वर्षांपासून ते आजाराने त्रस्त होते. ते आधी शिवसेनेत होते. त्यांची भाजपमध्ये सेंकड टर्म होती.

COMMENTS