धुळे प्रतिनिधी - भाजपचे ज्येष्ठ नेते तसेच धुळे लोकसभा मतदार संघाचे माजी खासदार प्रतापदादा नारायण सोनवणे यांचे शुक्रवारी सकाळी अल्पशा आजाराने न
धुळे प्रतिनिधी – भाजपचे ज्येष्ठ नेते तसेच धुळे लोकसभा मतदार संघाचे माजी खासदार प्रतापदादा नारायण सोनवणे यांचे शुक्रवारी सकाळी अल्पशा आजाराने निधन झाले. शुक्रवारी प्रताप दादांचा 75 वा वाढदिवस होता. त्याच दिवशी त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या जाण्याने मतदारसंघातून हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली, एक मुलगा व नातवंडे असा परिवार आहे.
प्रतापदादा जनसंघाचे जुने कार्यकर्ते होते. नाशिक विभाग पदवीधर मतदारसंघातून प्रतापदादा सोनावणे सलग दोनवेळा निवडून आले होते. मतदारसंघ पूर्नरचनेत धुळे नवीन लोकसभा मतदारसंघ अस्तित्वात आला असता या मतदार संघातून 2009 मध्ये पहिल्यांदा ते विजयी झाले. दादांचे शैक्षणिक क्षेत्रात मोठे योगदान राहिले. राज्यातील दुसऱ्या क्रमांकांची शैक्षणिक संस्था म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मराठा विद्या प्रसारक शिक्षण संस्थेचे अध्यक्ष व सभापती अशी पदे त्यांनी भूषवली होती. प्रतापदादांच्या जाण्याने जिल्ह्याची मोठी हानी झाल्याचे मंत्री दादा भुसे म्हणाले. ते म्हणाले की प्रतापदादांनी कधीही सत्ता वा कसलाही मोह ठेवला नाही. आपले आयुष्य जनतेप्रती समर्पित केले. एक चांगला व स्वच्छ प्रतिमा असलेला नेता आपण गमावला असल्याचे दादा भुसे म्हटले.
COMMENTS