Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

भाजपने केला शिवसेनेच्या 18 जागांवर दावा

पक्षाने आदेश दिल्यास लोकसभा लढणार ः केंद्रीय मंत्री डॉ. कराड

औरंगाबाद/प्रतिनिधी ः लोकसभेच्या 2024 च्या निवडणुकीची भाजपने आतापासूनच सुरूवात केली असून, 2019 मध्ये शिवसेना लढलेल्या 18 लोकसभेच्या जागांवर भाजपने

औरंगाबादमधून आणखी तीन मुली बेपत्ता
औरंगाबादेत सैराटची पुनरावृत्ती ! बहिणीशी प्रेमविवाह करणाऱ्या तरुणाला भररस्त्यात संपवलं
कुणबी दाखल्यासाठी मागासवर्गीय आयोगाचा दौरा

औरंगाबाद/प्रतिनिधी ः लोकसभेच्या 2024 च्या निवडणुकीची भाजपने आतापासूनच सुरूवात केली असून, 2019 मध्ये शिवसेना लढलेल्या 18 लोकसभेच्या जागांवर भाजपने दावा केला असून, या जागा निवडणूक लढण्याची तयारी भाजपने सुरु केली आहे. त्यात औरंगाबाद, परभणी, हिंगोली आणि उस्मानाबाद या चारही जागांवर भाजपने दावा केलाय. भाजपने याआधी जिथे निवडणूक लढवली नाही, अशा सर्वच मतदारसंघात तयारी सुरू आहे, अशी माहिती केंद्रीय मंत्री भागवत कराड यांनी दिलीय. ते औरंगाबादेत बोलत होते.

उस्मानाबाद आणि परभणीमध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार आहेत. तर औरंगाबादमध्ये एमआयएमचा खासदार आहे, पक्षाने आदेश दिल्यास लोकसभा लढवण्यास तयार असल्याचे केंद्रीय मंत्री भागवत कराड यांनी म्हटले आहे. केंद्रीय मंत्री भागवत कराड म्हणाले की, मी पक्षाचा 30 वर्षांपासून काम करतोय, पक्षाने आदेश दिल्यास मी लोकसभा निवडणूक लढवणार.  हिंदुत्वासाठी शिवसेना-भाजप म्हणून आम्ही लढलो आहोत, आम्ही देखील बाळासाहेबांच्या नेतृत्वात काम केले आहे. मात्र, 2019 ला काय झाले हे सर्वांनी पाहिले आहे. जनतेला आता सर्व समजले आहे, जनता आमच्या पाठिशी आहे. भाजप आणि बाळासाहेबांची शिवसेना यांना जनतेचा पाठिंबा आहे. केंद्रातील 2024 पर्यंत आहेच. राज्यातील सरकारही आपला कार्यकाळ पूर्ण करेल असे सांगतानाच आगामी निवडणुकीत देखील केंद्रात भाजपचे आणि राज्यात भाजप- बाळासाहेबांच्या शिवसेनेचे राज्य येईल असे त्यांनी म्हटले आहे. राज्यात शिवसेनेचे 2019 मध्ये 18 खासदार निवडून आले होते. या सर्व मतदारसंघात भाजपकडून तयारी सुरू करण्यात आली आहे. 2024 साठी भाजपकडून 400+ चे टार्गेट ठेवण्यात आले आहे. याच अनुषंगाने केंद्रीय मंत्र्यांना विविध लोकसभा मतदारसंघ संघटनात्मक मजबुतीसाठी वाटून दिले आहेत. मराठवाड्यातील औरंगाबाद, परभणी, उस्मानाबाद आणि हिंगोली या मतदारसंघात तयारी सुरू केली आहे. निवडणूक कोणी लढवायची ते पक्षाचे अध्यक्ष ठरवतील असे कराड यांनी म्हटले आहे. कराड यांच्या वक्तव्यामुळे भाजप पुन्हा एकदार 2024 च्या निवडणुकीत पूर्ण ताकदीनिशी उतरतांना दिसून येत आहे.

COMMENTS