नवी दिल्ली ः तृणमूल काँगे्रसच्या अध्यक्षा ममता बॅनजी यांच्यावर आक्षेपार्ह टिप्पणी करणे भाजपच्या उमेदवाराला महागात पडले आहे. भाजपचे उमेदवार अभिजित

नवी दिल्ली ः तृणमूल काँगे्रसच्या अध्यक्षा ममता बॅनजी यांच्यावर आक्षेपार्ह टिप्पणी करणे भाजपच्या उमेदवाराला महागात पडले आहे. भाजपचे उमेदवार अभिजित गंगोपाध्याय यांना मंगळवारपासून पुढील 24 तास निवडणूक प्रचारासाठी निवडणूक आयोगाने बंदी घातली आहे. निवडणूक आयोगाने आदर्श आचारसंहितेअंतर्गत अशी वक्तव्य करताना सावध राहण्याचा इशारा देखील दिला आहे. गंगोपाध्याय 15 मे रोजी बंगालच्या हल्दियामध्ये म्हणाले होते की, ममता किती पैशात विकली जात आहे मला आश्चर्य वाटते. 10 लाख रुपये? ती एक स्त्री आहे की नाही याबद्दल मला आश्चर्य वाटते. निवडणूक आयोगाने गंगोपाध्याय यांच्या वक्तव्याचे वर्णन अत्यंत खालच्या पातळीवरील वैयक्तिक हल्ला, जे आचारसंहितेचे उल्लंघन करते, असे केले आहे. निवडणूक आयोगाचा हा आदेश मंगळवारी सायंकाळी 5 वाजल्यापासून लागू होणार आहे. निवडणूक आयोगाने 17 मे रोजी या विधानाची दखल घेत हे विधान चुकीचे, तर्कहीन आणि प्रतिष्ठेच्या पलीकडे असल्याचे म्हटले होते. या असभ्य टिप्पणीमुळे निवडणूक आयोगाने गंगोपाध्याय यांना कारणे दाखवा नोटीस पाठवली होती, ज्याला गंगोपाध्याय यांनी सोमवारी उत्तर दिले. आयोगाने गंगोपाध्याय यांच्याकडून 20 मेपर्यंत उत्तर मागितले होते. गंगोपाध्याय यांचे उत्तर वाचून आयोगाने त्यांचे म्हणणे पुन्हा ऐकून घेतले आणि त्यांनी ममतांवर खालच्या पातळीवरचा वैयक्तिक हल्ला केल्याचा निष्कर्ष काढला. या विधानावरून देशातील महिलांची स्थिती काय आहे, हे लक्षात येते, असेही आयोगाने म्हटले आहे. या वक्तव्यामुळे बंगालचा अपमान झाला आहे.
COMMENTS