नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरमध्ये तब्बल एका दशकानंतर विधानसभेची निवडणूक होत असून, या निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी कंबर कसली आहे. या विधानसभा निवडणुक

नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरमध्ये तब्बल एका दशकानंतर विधानसभेची निवडणूक होत असून, या निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी कंबर कसली आहे. या विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने सकाळी 44 उमेदवारांची यादी जाहीर केली होती. मात्र दोन तासांनंतर ही यादी ट्विटरवरून हटवण्यात आली. त्यानंतर काही वेळांतच पहिल्या टप्प्यातील 15 उमेदवारांची नावे आहेत. यामध्ये कोणताही बदल नाही. पहिल्या यादीत दोन माजी उपमुख्यमंत्री निर्मल सिंग, कविंद्र गुप्ता आणि जम्मू-काश्मीर पक्षाचे अध्यक्ष रवींद्र रैना यांची नावे काढून टाकलेल्या यादीत नव्हते.
भाजपने जाहीर केलेल्या पहिल्या यादीत तिसर्या टप्प्यातील 44 उमेदवारांची नावे होती. यामध्ये तीन प्रसिद्ध चेहर्यांच्या नावांचा समावेश नव्हता. यामध्ये दोन माजी उपमुख्यमंत्री निर्मल सिंग आणि कविंदर गुप्ता यांच्या नावांचा समावेश नव्हता. याशिवाय जम्मू-काश्मीर पक्षाचे अध्यक्ष रवींद्र रैना यांचेही नाव या यादीत नव्हते. नगरोटामधून भाजपने डॉ. देवेंदरसिंह राणा यांना तिकीट दिले आहे. ते केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांचे भाऊ आहेत आणि नॅशनल कॉन्फरन्स सोडून भाजपमध्ये दाखल झाले होते, कारण पंतप्रधानांनी 15 ऑगस्ट रोजी लाल किल्ल्यावरून सांगितले होते ’राजकारणात ताजे रक्त आवश्यक आहे. एक लाख तरुणांना राजकारणात आणायचे आहे. असे तरुण ज्यांच्या कुटुंबाला राजकीय पार्श्वभूमी नाही. जम्मू-काश्मीरमधील 90 जागांसाठी 18 सप्टेंबर ते 1 ऑक्टोबर दरम्यान तीन टप्प्यांत मतदान होणार आहे. 4 ऑक्टोबर 2024 रोजी निकाल लागतील. विजयाचा बहुमताचा आकडा 46 आहे. जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणुकीसंदर्भात भारतीय जनता पक्षाचे प्रमुख नेते केंद्रशासित प्रदेशात आठ सभा घेणार आहेत. दरम्यान, जम्मू-काश्मीरचे भाजपचे निवडणूक प्रभारी राम माधव आणि जी किशन रेड्डी आज केंद्रशासित प्रदेशात पोहोचणार आहेत. या निवडणुकांमध्ये भाजप कोणत्याही राजकीय पक्षासोबत युती करणार नाही आणि काश्मीर खोर्यातील ज्या विधानसभा जागांवर पक्ष निवडणूक लढवणार नाही त्या ठिकाणी मजबूत अपक्ष उमेदवारांना पाठिंबा देईल.
COMMENTS