Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

राज्यात बिलावल भुट्टोंविरोधात भाजप आक्रमक

पाकिस्तानचा झेंडा जाळून केला निषेध

पुणे/प्रतिनिधी ः पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री बिलावल भुट्टो झरदारीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर गुजरात दंगलीच्या मुद्द्यावरून जहरी टीका के

 चंद्रशेखर बावनकुळे यांच्या बद्दल बोलण्याची रोहित पवार यांची पात्रता नाही – धर्मपाल मेश्राम 
शेवगावमध्ये हमालाचा असाही प्रामाणिकपणा
भूस्खलनात 138 लोक अजूनही बेपत्ता

पुणे/प्रतिनिधी ः पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री बिलावल भुट्टो झरदारीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर गुजरात दंगलीच्या मुद्द्यावरून जहरी टीका केली आहे. त्याविरोधात भारताने तीव्र शब्दांमध्ये प्रतिक्रिया दिली आहे. भाजपसुद्धा या टीकेविरोधात आक्रमक झाली आहे. शनिवारी पुणे, मुंबई, अहमदनगरसह विविध जिल्ह्यात भाजपने आक्रमकपणे आंदोलने केली. पुण्यात पाकिस्तानचा झेंडा जाळून भुट्टोचा निषेध केला.


संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या बैठकीदरम्यान भुट्टो यांनी मला भारताला सांगायचे आहे की ओसामा बिन लादेनचा मृत्यू जरी झाला असेल तरी गुजरातचा कसाई अजून जिवंत आहे आणि ते भारताचे पंतप्रधान आहेत. पंतप्रधान होईपर्यंत त्यांना या देशात (अमेरिकेत) प्रवेश करण्यावर बंदी होती. हे आरएसएसचे पंतप्रधान आणि परराष्ट्रमंत्री आहेत. आरएसएस काय आहे? ती सुद्धा एक प्रकारची दहशतवादी संघटना असल्याचे वक्तव्य केले. त्याचे पडसाद संपूर्ण भारतात उमटत असून पाकिस्तान आणि भुट्टोंचा निषेध करण्यात येत आहे.


शनिवारी पुण्यात भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नेतृत्वाखाली जोरदार आंदोलन करत कार्यकर्त्यांनी पाकिस्तानचा झेंडा जाळला. यावेळी माध्यमांशी बोलताना चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले की, बिलावल भुट्टो यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाविरोधात जी आक्षेपार्ह वक्तव्य केली आहेत. त्याचा निषेथ करण्यासाठी राज्यभरात 1200 ठिकाणी भाजप कार्यकर्ते रस्त्यावर उतरून आंदोलन करत आहेत. अलका टॉकीज चौक येथील निषेध आंदोलनात भाजप महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ, युवा मोर्चा प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील, प्रदेश सरचिटणीस आणि माजी महापौर मुरलीधर मोहोळ, आमदार माधुरी मिसाळ, आमदार सिद्धार्थ शिरोळे, राजेश पांडे, शहराध्यक्ष जगदीश मुळीक, राजेश पांडे, आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. आंदोलनात सहभागी भाजप नेत्या चित्रा वाघ म्हणाल्या, दहशतवाद अड्डा असलेला पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री बिलावल भुट्टो भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य करतात, ही बाब लाजिरवाणी गोष्ट आहे. हे घटनात्मक पद असून त्याचा निषेध महविकास आघाडीमधील नेत्यांनी केला पाहिजे. देशभरात या घटनेचा निषेध व्यक्त करण्यात येत आहे. पंतप्रधान मोदी यांचा अपमान देश सहन करणार नाही. यावेळी भाजपचे शेकडो कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले होते.

पाकिस्तानची हतबलता दिसून येते ः बावनकुळे
आंदोलनादरम्यान भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री बिलावल भुट्टो यांच्या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी हे आंदोलन करत आहोत.  देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जगाने मान्यता दिली आहे. त्यामुळे पाकिस्तानला आता भारतात येऊन बॉम्ब स्फोट करता येत नाही. अतिरेक्यांना पाठिंबा देता येत नाही. भारतात दहशतवादी कारवाया करता येत नाही. पाकिस्तान हतबल झालाला आहे. भारतीय संस्कृती जगात नेण्याचे काम पंतप्रधान करत असून त्याबाबत पाकिस्तानला अडचण वाटत असल्याची टीका बावनकुळे यांनी केली.  

COMMENTS