Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

जन्मदात्या आईचा गळा आवळून खून

नवी मुंबई प्रतिनिधी - आई आणि मुलाचं नातंच वेगळं असत. आई आपल्या मुलाच्या सुखासाठी आपले सर्व आयुष्य पणाला लावते. मात्र एका मुलाने आपल्या जन्मदा

महाविकास आघाडी अडचणीत
दरोडा टाकण्याच्या तयारीतील टोळी जेरबंद
विठ्ठलाचे दर्शन घेऊन परत जाताना भाविकांच्या गाडीला भीषण अपघात

नवी मुंबई प्रतिनिधी – आई आणि मुलाचं नातंच वेगळं असत. आई आपल्या मुलाच्या सुखासाठी आपले सर्व आयुष्य पणाला लावते. मात्र एका मुलाने आपल्या जन्मदाती आईलाच ठार मारले आहे. नवी मुंबईच्या कोपरी गावात एका मुलाने कामावर जाण्यावरून झालेल्या भांडणामुळे रागाच्या भरात येऊन गळा आवळून हत्या केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी आरोपी मुलाला पोलिसांनी अटक केली आहे. सदर घटना नवी मुंबईच्या कोपरी गावात घडली आहे. कामाला जाण्यावरून आई सलमा रहमान शेख आणि रुपचंद मुलामध्ये मध्यरात्री भांडण झाले. रागाच्या भरात येऊन मुलाने आईची गळा आवळून हत्या केली. सलमा रहमान शेख असे या मयत महिलेचे नाव आहे

COMMENTS