Homeताज्या बातम्यामनोरंजन

बिग बॉस फेम राकेश बापटची तब्येत बिघडली

टीव्ही आणि चित्रपट अभिनेता राकेश बापटने त्याच्या सोशल मीडियावरून एक व्हिडीओ शेअर केला आहे. त्याची पोस्ट पाहून त्याचे चाहते चिंतेत आहेत. राकेशने त

17 हजार रुपये ‘PhonePe’ वर लाच घेताना 2 तलाठी एसीबी पथकाच्या जाळ्यात | LOK News 24
मराठ्यांच्या लढ्याला मोठं यश
भिल्ल समाज स्मशानभूमी अतिक्रमण प्रकरणी कार्यवाही करा

टीव्ही आणि चित्रपट अभिनेता राकेश बापटने त्याच्या सोशल मीडियावरून एक व्हिडीओ शेअर केला आहे. त्याची पोस्ट पाहून त्याचे चाहते चिंतेत आहेत. राकेशने त्याच्या प्रकृतीविषयीचे अपडेट शेअर केले आहेत. इंस्टाग्राम स्टोरीवर व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यामध्ये त्याच्या हातात इंट्राव्हेन्स ड्रीप देखील आहे. राकेश हॉस्पिटलाईज होण्याची हिची पहिली वेळ नाही. २०२१मध्ये त्याला किडनी स्टोन झाला होता. त्यामुळे त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. ‘बिग बॉस ओटीटी’ शो देखील त्याला त्याच्या आजारपणामुळे सोडावा लागला होता. राकेशने व्हिडीओ शेअर करत चाहत्यांचे आभार मानले आहेत. राकेश दुबईला एका प्रोजेक्टचे शूट करण्यासाठी गेला होता. व्हिडीओ शेअर करत राकेशन बापटने सांगितले की, मी दुबईमध्ये शूटिंग करत होतो. इथे तापमान खूप जास्त आहे. त्यामुळे मला खुप त्रास झाला. ताप आणि ब्लड प्रेशरमुळे मला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

COMMENTS