आई कुठे काय करते' या मालिकेत लवकरच अरुंधती दुसऱ्यांदा बोहल्यावर चढणार आहे. अरुंधती आणि आशुतोषचं लग्न धुमधडाक्यात पार पडणार आहे. पण त्याआधी मालिके

आई कुठे काय करते’ या मालिकेत लवकरच अरुंधती दुसऱ्यांदा बोहल्यावर चढणार आहे. अरुंधती आणि आशुतोषचं लग्न धुमधडाक्यात पार पडणार आहे. पण त्याआधी मालिकेत एक ट्विस्ट येणार आहे आणि तो अनिरुद्ध मुळे येणार आहे. लग्नाआधी अरुंधतीचं मंगळसूत्र तुटतं तेव्हा सगळेजण अनिरुद्धवर संशय घेतात. अनिरुद्धच्या या वागण्यामुळे अरुंधती चांगलीच चिडते. ती त्याला म्हणते, ‘आम्ही मनाने कधीच एकत्र झालोय आणि तुम्ही काहीही केलं तरी आता त्याने काहीही फरक पडणार नाही. अनिरुद्धच्या या वागण्यामुळे अरुंधतीसोबतच अप्पा सुद्धा चांगलेच चिडतात आणि अनिरुद्धला चांगलंच सुनावतात. एवढाच नाही तर अनिरुद्धच्या या वागण्यामुळे त्याच्या बाजूने असणारे कांचन आणि अभिसुद्धा चांगलेच चिडले आहेत. तर दुसरीकडे मालिकेत गौरीच्या एंट्रीने सुद्धा मालिकेत नवीन संकट येण्याची शक्यता आहे. आता मालिकेत पुन्हा कोणता नवा ट्विस्ट येणार? की लग्न व्यवस्थित पार पडणार? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे
COMMENTS