Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

शेवगावमध्ये 23 नोव्हेंबरला मनोज जरांगे यांची विराट सभा

शेवगाव ः मराठा आरक्षण मुद्यासाठी मराठयांचा संघर्षयौध्दा मनोज जरांगे पाटील यांची सभा गुरुवार ता.23 रोजी साई लाँन्स पाथर्डी रोड,शेवगाव येथे दुपारी

कोरोना संकटात नीलेश लंके यांची ऐतिहासिक कामगिरी
धर्मरक्षणासाठी तरूणांना एकत्र आणण्याचे काम देवस्थानांनी केले पाहिजे
माथेफिरूकडून मुलीची छेड ; शेवगावात पाळला बंद

शेवगाव ः मराठा आरक्षण मुद्यासाठी मराठयांचा संघर्षयौध्दा मनोज जरांगे पाटील यांची सभा गुरुवार ता.23 रोजी साई लाँन्स पाथर्डी रोड,शेवगाव येथे दुपारी 1 वाजता होणार आहे. या सभेची  तयारी सुरू असून लाखभरांपेक्षा अधिक मराठा बांधव उपस्थित राहतील. अशी माहिती सकल मराठा नियोजन समितीच्या वतीने देण्यात आली आहे.
     मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी समाजामध्ये जनजागृती करण्यासाठी राज्यभर तिसर्‍या टप्प्यातील दौर्‍याला सुरुवात केली आहे.राज्यात त्यांच्या विविध ठिकाणी सभा सुरू आहेत. शेवगाव शहरात जरांगे पाटील प्रथमच येत असून ही सभा नियोजनबध्द व्हावी यासाठी मराठा समाज समितीचे पदाधिकारी सरसावले आहेत. नेवासा येथे गुरुवार ता.23 रोजी सकाळी जरांगे यांची सभा होणार आहे. सभा संपल्यानंतर नेवासा-शेवगाव राज्यमार्गावर ठिकठिकाणी जरांगे यांचे स्वागत करण्यात येणार आहे.त्यानंतर शेवगाव येथे दुपारी 1 वाजता साई लाँन्स पाथर्डी रोड, शेवगाव येथे सभेचे आयोजन करण्यात येणार आहे. महिला व वृध्दांना स्वतंत्र बैठक व्यवस्था करण्यात आली आहे.सभेस्थळी पाणी व वैद्यकीय व्यवस्था करण्यात आलेली आहे. या सभेसाठी तालुक्यासह जिल्हयातील मराठा समाजाच्या नागरीकांनी उपस्थित रहावे. असे आवाहन  नियोजन समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

सभेला मोठ्या संख्येने उपस्थित राहा ः अनिल सुपेकर –  मराठा संघर्षयोद्धा मनोज जरंगे पाटील यांनी मराठा कुणबी आरक्षण मागणी ही कायद्याच्या चौकटीत बसणारी मागणी आहे. याच संदर्भात मराठा समाजात जागृती करण्यासाठी महाराष्ट्रात तिसर्‍या टप्प्यातील दौर्‍यादरम्यान जरांगे पाटील शेवगाव येथे येत आहेत. मराठा आरक्षणासाठी 24 डिसेंबर पर्यंत शासनाने मुदत घेतलेली आहे. याच कालावधीत सकल मराठा समाजाचे आशीर्वाद घेण्यासाठी मनोज जरांगे पाटील वेगवेगळ्या जिल्ह्यातून महाराष्ट्राचा दौरा करत आहेत. याच दौर्‍याचा एक भाग म्हणून दिनांक 23 नोव्हेंबर रोजी साई लॉन्स पाथर्डी रोड शेवगाव येथे विराट सभेचं आयोजन केले आहे. तरी या सभेसाठी तालुक्यातील सकल मराठा समाजातील स्त्री-पुरुषांसह सर्वांनी उपस्थित राहावे असे आव्हान स्वाभिमानी मराठा महासंघ तालुकाध्यक्ष अनिलभाऊ सुपेकर एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले.

COMMENTS