Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मुंबईमध्ये निघाला विराट हिंदू जनआक्रोश मोर्चा

धर्मांतर, लव्ह-जिहादविरोधात हिंदूत्ववादी संघटना सहभागी

मुंबई/प्रतिनिधी ः सकल हिंदू समाजाकडून रविवारी मुंबईत विराट हिंदू जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला. शिवाजी पार्क ते प्रभादेवी असे मार्गक्रमण करणार्‍य

संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन 31 जानेवारीपासून
दीपक तनपुरे मराठा महासंघाच्या जिल्हा उपाध्यक्षपदी
अवैध विक्री होणाऱ्या गुटख्यावर प्रतिबंधासाठी विशेष मोहिम राबवा:पालकमंत्री डॉ.राजेंद्र शिंगणे

मुंबई/प्रतिनिधी ः सकल हिंदू समाजाकडून रविवारी मुंबईत विराट हिंदू जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला. शिवाजी पार्क ते प्रभादेवी असे मार्गक्रमण करणार्‍या या मोर्चात अनेक हिंदुत्ववादी संघटना या मोर्चात सहभागी झाल्या होत्या. लव्ह जिहाद आणि धर्मांतर विरोधी कायदा लागू करण्याच्या मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात आला आहे. या मोर्चात शिंदे गट, भाजप नेते आणि मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झाल्याचे दिसून आले. विशेष म्हणजे मोर्चात महिलांची संख्या देखील मोठी होती.
शिवाजी पार्कवरील या मोर्चामध्ये हजारो नागरिकांसह मंत्री मंगलप्रभात लोढा, भाजप नेते आशिष शेलार, प्रवीण दरेकर, चित्रा वाघ यांच्यासह अनेक भाजप नेते व पदाधिकारीही सहभागी झाले होते. मोर्चात सहभागी झालेले भाजप नेते आशिष शेलार यांनी सांगितले की, सकल हिंदू समाजाने काढलेला हा मोर्चा आहे. त्यामुळे पक्षाभिनिवेश बाजूला ठेवून आम्ही या मोर्चात सहभागी झालो आहोत. लव्ह जिहाद आणि मुंबईतील लँड जिहादविरोधात हिंदू समाजात संतप्त भावना आहे. हा मोर्चा म्हणजे त्या संतप्त भावनेची स्वाभाविक प्रतिक्रिया आहे. आम्ही कट्टर हिंदू म्हणून या मोर्चात सहभागी झालो आहोत. पुढे आशिष शेलार म्हणाले की, मोर्चामुळे भाजपला काय फायदा होईल, या दृष्टीकोनातून आम्ही या मोर्चाकडे पाहत नाही. लव्ह जिहादच्या नावाखाली मुलींची फसवणूक केली जात आहे. त्यांचे तुकडे-तुकडे केले जातात. याचे दु:ख आहे. मुंबईत थोडी जरी मोकळी जागा मिळाली तरी एका विशिष्ट समाजाने तेथे प्रार्थना स्थळ बांधलचं, अशी स्थिती आहे. या सर्वांच्या विरोधात हिंदूंनी आज हे विराट रुप प्रदर्शित केले आहे. भाजप नेते प्रवीण दरेकर म्हणाले, हिंदू समाजातील मुलींना प्रलोभन दाखवून त्यांचे धर्मांतर केले जात आहे. लँड माफियाकडून मोठ्य प्रमाणात जागा हडप केली जात आहे. अशास्थितीत धर्मांतर विरोधी कायदा बनावे, हि हिंदू समाजाची मागणी आहे. त्यासाठीच आज सकल हिंदू समाज एकवटला असल्याचे दरेकर म्हणाले.

COMMENTS