Big Breaking News : व्हिसा संपल्याने रशियन महिला बसली गुहेत लपून

Homeताज्या बातम्याविदेश

Big Breaking News : व्हिसा संपल्याने रशियन महिला बसली गुहेत लपून

बेंगळुरू : व्यावसायिक व्हिसा घेऊन भारतात आलेली रशियन महिला कर्नाटकच्या उत्तर कन्नड जिल्ह्यातील गोकर्ण इथल्या रामतीर्थ डोंगरावरील गुहेत लपून बसली होती

जामखेड बाजार समितीची निवडणूक जिंकायचीच  
दिवंगत आमदार भिकचंदजी दोंदे फाऊंडेशन ने अखेर दिला आदिवासी बांधवाना न्याय
महादेव बेटिंग अ‍ॅपप्रकरणी पुण्यात कारवाई

बेंगळुरू : व्यावसायिक व्हिसा घेऊन भारतात आलेली रशियन महिला कर्नाटकच्या उत्तर कन्नड जिल्ह्यातील गोकर्ण इथल्या रामतीर्थ डोंगरावरील गुहेत लपून बसली होती. व्हिसा संपल्यामुळे ही महिला आपल्या 2 मुलींसह इथे वास्तव्याला होती. गस्तीदरम्यान पोलिसांनी तिला सुरक्षित बाहेर काढून एका आश्रमात ठेवले आहे.


यासंदर्भातील माहितीनुसार नीना कुटिना नामक 40 वर्षीय रशियन महिला आपल्या प्रेमा (वय 6 वर्षे) अमा (वय 4 वर्षे) या 2 मुलींसह गुहेत दडून बसली होती. याबाबत माहिती मिळताच स्थानिक पोलिस आणि वन विभागाच्या चमूने तिला गुहेतून शोधून बाहेर काढले. अध्यात्मिक शांती आणि ध्यान धारणेसाठी एकांतवासात राहण्याच्या हेतूने या गुहेचा आश्रय घेतल्याचे तिने पोलिसांना सांगितले. हा परिसर विषारी साप, जंगली प्राणी आणि अपघाती धोक्यांसाठी प्रसिद्ध आहे.

त्यामुळे येथे राहाणे अत्यंत धोकादायक ठरते, असे पोलिसांनी स्पष्ट केले. सुरुवातीला नीना हिचे व्हिसा आणि पासपोर्ट हरवले असल्याचे तिने सांगितले मात्र गोकर्ण पोलिस आणि वनविभागाच्या संयुक्त शोध मोहिमेमध्ये हे दस्तऐवज गुहेतून मिळाले. त्यानंतर जेव्हा कागदपत्रांची तपासणी करण्यात आली. त्यात कळाले की, नीना ही 17 एप्रिल 2017 पर्यंत वैध असलेल्या व्यवसायिक व्हिसावर भारतात आली होती. तिला 19 एप्रिल 2018 पर्यंत गोवा एफआरआरओ कडून एक्झिट परमिट देखील देण्यात आले होते. मात्र त्यानंतर तिने नेपाळला प्रवास करून 8 सप्टेंबर 2018 रोजी पुन्हा भारतात प्रवेश केला आणि त्यानंतर ती बेकायदेशीररीत्या येथे वास्तव्य करत होती.

महिलेच्या विनंतीनुसार पोलिसांनी तिला उत्तर कन्नड जिल्ह्यातील कुमटा तालुक्यात बंकीकोडळा गावातील एका आश्रमात हलवले आहे. हा आश्रम 80 वर्षीय स्वामी योगरत्ना सरस्वती यांच्या मार्गदर्शनाखाली चालवला जातो. सध्या नीना व तिच्या मुली आश्रमात राहत असून, स्थानिक प्रशासन व सामाजिक कल्याण विभाग यांच्याकडून योग्य समुपदेशन व तपासणी सुरू आहे.

COMMENTS