Homeताज्या बातम्याक्रीडा

सनरायझर्स हैदराबाद संघाला मोठा झटका

वॉशिंग्टन सुंदर आयपीएल 2023 मधून बाहेर

इंडियन प्रीमियर लीग 2023 मध्ये सनरायझर्स हैदराबाद संघाला मोठा झटका बसला आहे. वॉशिंग्टन सुंदर आयपीएल 2023 मधून बाहेर गेला आहे. हॅमस्ट्रिंगच्या दुख

अभिनेता माधवनच्या मुलाची भरारी
टी – २० वर्ल्डकपसाठी पंचांची घोषणा… भारताचा एकमेव पंच…
निसर्ग गार्डन कात्रजची बैलगाडी ठरली बाबाराजे जावळी केसरीची मानकरी

इंडियन प्रीमियर लीग 2023 मध्ये सनरायझर्स हैदराबाद संघाला मोठा झटका बसला आहे. वॉशिंग्टन सुंदर आयपीएल 2023 मधून बाहेर गेला आहे. हॅमस्ट्रिंगच्या दुखापतीमुळे सनरायझर्स हैदराबादचा वॉशिंग्टन सुंदर या वर्षीच्या इंडियन प्रीमियर लीगमधून बाहेर पडला आहे. संघाने गुरुवारी याबाबत अधिकृत माहिती दिली आहे. सनरायजर्स हैदराबाद संघाने ट्विटरवर याबाबत ट्वीट करत माहिती दिली आहे की, ‘वॉशिंग्टन सुंदर हा हॅमस्ट्रिंगच्या दुखापतीमुळे आयपीएल 2023 मधून बाहेर पडला आहे. लवकर बर हो या आशयाची पोस्ट करण्यात आली आहे. हैदराबाद संघाने सांगितलं आहे की, दुखापतीमुळे वॉशिंग्टन सुंदर यंदाच्या आयपीएल मोसमातील पुढील सामने खेळू शकणार नाही. दरम्यान, वॉशिंग्टन सुंदर आयपीएलच्या 16 व्या हंगामात फलंदाजी आणि गोलंदाजीमध्ये आतापर्यंतच्या सामन्यांमध्ये प्रभावी ठरला नव्हता. सुंदरने आयपीएल 16 मध्ये खेळल्या गेलेल्या 7 सामन्यांच्या पाच डावांमध्ये 15 च्या सरासरीने आणि 100 च्या स्ट्राइक रेटने फक्त 60 धावा केल्या. सुंदरची सर्वाधिक धावसंख्या ही नाबाद 24 धावांची होती. गेल्या पाच सामन्यांमध्ये हैदराबाद संघाला फक्त दोन सामन्यांमध्ये विजय मिळवता आला आहे. गुणतालिकेत नवव्या क्रमांकावर असलेल सनरायझर्स हैदराबाद संघासाठी सुंदर संपूर्ण सीझनसाठी बाहेर जाणं हा मोठा धक्का आहे. हैदराबाद संघाकडे सध्या चार गुण आहेत. शनिवारी हैदराबाद संघाचा सामना दहाव्या क्रमांकावर असणाऱ्या दिल्ली कॅपिटल्स संघाशी होणार आहे.

COMMENTS