Homeताज्या बातम्यामनोरंजन

KGF स्टार यशच्या वाढदिवसाची तयारी करत असताना मोठा अपघात

कन्नड सुपरस्टार यश आज त्याचा 38 वा वाढदिवस साजरा करत आहे. KGF फ्रँचायझीच्या जबरदस्त यशानंतर यश हा नवा 'पॅन इंडियन स्टार' म्हणुन लोकप्रिय झाला. त्

दिग्दर्शक सावन कुमार टाक यांचे निधन
कुत्र्याच्या पट्टयाने स्वतःच्या मुलाची गळा आवळून बापाने केली हत्या ILOKNews24
पिंपरी चिंचवडमध्ये 7 जणांचा होरपळून मृत्यू

कन्नड सुपरस्टार यश आज त्याचा 38 वा वाढदिवस साजरा करत आहे. KGF फ्रँचायझीच्या जबरदस्त यशानंतर यश हा नवा ‘पॅन इंडियन स्टार’ म्हणुन लोकप्रिय झाला. त्याने 2000 च्या दशकात आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली अन् आता तो साउथवरच नव्हे तर पूर्ण भारतातील चाहत्यांच्या मनावर राज्य करत आहे. यशचे चाहते त्याच्या वाढदिवसाची तयारी एक दिवस आधीच सुरू करतात. यशचा कट-आउट बसवताना विजेचा धक्का लागून तीन तरुणांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. तर या घटनेत तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. उघड्या विद्युत तारेला स्पर्श झाल्याने तीन तरुणांचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात गदग जिल्ह्यातील लक्ष्मेश्वर तालुक्यातील सुरंगी गावात मध्यरात्री घडला. या घटनेत 21वर्षीय हणमंता हरिजन, 20 वर्षीय मुरली नदविनमणी आणि 19वर्षीय नवीन गाझी यांचा जागीच मृत्यू झाला. तर तिघे जण गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर लक्ष्मेश्वर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

COMMENTS