Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मणिपूर हिंसाचार प्रकरणी बीडकरांचे आक्रोश आंदोलन

बीड प्रतिनिधी - हिंसाचारग्रस्त मणिपुरात कुकी समुदायाच्या महिलांना निर्वस्त्र करुन त्यांची धिंड काढल्याची राष्ट्रीय मानहानी कारक घटनेच्या निषेधार्

राजकीय सूडबुद्धीसाठी केंद्रीय यंत्रणांचा वापर करू नये – एकनाथ शिंदे | LOKNews24
संभाजीराजेंनी अपक्ष लढाव हा तर फडणवीसांचा डाव | DAINIK LOKMNTHAN
संजय राऊत यांच्या अहंकाराचा बेळगावात पराभव : फडणवीसांचा टोला

बीड प्रतिनिधी – हिंसाचारग्रस्त मणिपुरात कुकी समुदायाच्या महिलांना निर्वस्त्र करुन त्यांची धिंड काढल्याची राष्ट्रीय मानहानी कारक घटनेच्या निषेधार्थ व संबंधित दोषींना मृत्युदंडाची शिक्षा देण्यात यावी आणि निष्क्रिय मणिपूर सरकार बरखास्त करून आणीबाणी लागु करण्यात यावी आणि महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो कोर्ट परीसरातुन हटवा अन्यथा कारवाई करु या परिपत्रकाच्या निषेधार्थ वरील प्रमुख मागण्यांसाठी सामाजिक कार्यकर्ते डॉ.गणेश ढवळे लिंबागणेशकर यांच्या नेतृत्वाखाली आज दि.24 जुलै सोमवार रोजी घोषणाबाजी करत   रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आक्रोश आंदोलनकरण्यात येऊन जिल्हाधिकारी बीड दिपा मुधोळ -मुंढे यांच्या मार्फत राष्ट्रपती, पंतप्रधान, केंद्रीय गृहमंत्री, केंद्रीय महिला व बालकल्याण मंत्री, अध्यक्ष राष्ट्रीय महिला आयोग यांना निवेदन देण्यात आले. आंदोलनात शेख युनुस, रामनाथ खोड,इंन्फंट इंडियाचे संचालक दत्ताभाऊ बारगजे,संध्या बारगजे,एमआयएमचे जिल्हाध्यक्ष शेख शफीकभाऊ,आम आदमी पार्टीचे जिल्हाध्यक्ष अशोक येडे, सचिव रामधन जमाले, शहराध्यक्ष सादेक सय्यद, संभाजी ब्रिगेड बीड जिल्हाध्यक्ष अँड.गणेश मस्के,ऑल इंडिया पँथर सेनेचे जिल्हाध्यक्ष नितीन सोनावणे, लोकसेना संघटनेचे प्रा.इलियास इनामदार, सामाजिक कार्यकर्ते संगमेश्वर आंधळकर, अँड.राजेश शिंदे, रामहरी मोरे,  बीड जिल्हाध्यक्ष भारतीय महिला फेडरेशन अँड.करूणा टाकसाळ, बीड जिल्हा शिवसंग्राम महिला अध्यक्षा अँड.मनिषा कुपेकर, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अतुल बडवे, अध्यक्षा विश्वकल्याण महिला सेवाभावी संस्थेच्या किष्किंधा पांचाळ अनिता गायकवाड, शेरजमा खान, भिमराव कुटे, बलभीम उबाळे, शेख मुश्ताक, वशिष्ट साबळे, भिमराव पांचाळ, तांदळे सुदाम, नितीन गायकवाड, आदिविविध सामाजिक संघटना, राजकीय नेते, कार्यकर्ते सहभागी होते.
दि.4 मे 2023 रोजी मणिपूर मधिल कांगपोकपी जिल्ह्यात बी फिनोम गावात जमावाने तोडफोड करत, लुटमार करत कुकी समुदायाची घरे जाळण्यात येऊन लोकांची हत्या करण्यात आली.दोन महिलांची निर्वस्त्र धिंड काढण्यात आली संबंधित प्रकरणात दि.21 जुन 2023 रोजी पोलिसात तक्रार नोंदवण्यात आली.आणि दि.19 जुलै रोजी महिलांची निर्वस्त्र धिंड काढण्याच्या घटनेचा व्हिडिओ सोशल मिडीयावर पाहण्यात आला.पिडीत व प्रत्यक्षदर्शींनी जमाव अत्याचार करत असताना बघ्याची भूमिका घेतल्याचा आरोप केला असुन या राष्ट्रीय मानहानीकारक घटनेवर देशभरातुन संताप व्यक्त होत असुन या घटनेची सरन्यायाधीश डॉ.धनंजय चंद्रचूड यांनी दखल घेत संबंधित घटना म्हणजे घटनात्मक व मानवाधिकाराचे उल्लंघन असुन कोणत्याही घटनात्मक लोकशाही मध्ये अशा गोष्टींना थारा नसल्याचे नमुद करत मणिपुर सरकारने तातडीने कारवाई करावी अन्यथा आम्ही कारवाई करू म्हणत तिव्र नाराजी व्यक्त केली आहे.या अमानुष अमानवीय घटनेतील दोषींना मृत्युदंडाची शिक्षा देण्यात यावी.  मणिपुर राज्य गेल्या 3 महिन्यांपासून जातीय हिंसाचारात होरपळत असुन प्रामुख्याने इंफाळ खो-यात राहणा-या आणि लोकसंख्येच्या 53 टक्के समुदाय असलेल्या मैतेई समुदायाला अनुसूचित जमातीचा दर्जा देण्याच्या मागणीला डोंगराळ भागातील नागा व कुकी या 40 टक्के आदिवासी समाजाचा विरोध आहे.या विरोधाने हिंसक रुप धारण केले असुन आतापर्यंत 160 पेक्षा अधिक मृत्यू,5000 पेक्षा अधिक जखमी आणि 50 हजार पेक्षा अधिक भारतीय बेघर झालेले असुन मणिपुर सरकार निष्क्रिय असुन गंभीर परिस्थिती आटोक्यात आणण्यास सक्षम नसल्याने त्याठिकाणी आणीबाणी लागु करण्यात यावी. मद्रास उच्च न्यायालयाच्या रजिस्ट्रार जनरल यांच्या वतीने जिल्हा सत्र न्यायालयांना एक परिपत्रक जारी करत तामिळनाडू आणि पुदुच्चेरीच्या न्यायालय परिसरात महात्मा गांधी आणि संत तिरूवल्लूवर यांच्याशिवाय ईतर कोणाचेही फोटो लावण्यात येऊ नये तसेच अन्य कोणाचा फोटो लावण्यात आलेला असेल तर तो  हटवण्यात यावा कांचीपुरम येथील प्रिंसिपल डिस्ट्रीक जज म्हणाले की ते अलंदूर बार असोशिएशन यांना सांगतिल की नव्याने बांधण्यात आलेल्या कोर्ट परीसरातील लावण्यात आलेला डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो हटविण्यात यावा हि बाब निषेधार्थ असुन संबंधित प्रकरणात जारी केलेले परिपत्रक मागे घेण्यात यावे.अशी मागणी करण्यात आली आहे.

COMMENTS