Homeताज्या बातम्यादेश

बिभव कुमारला 5 दिवसांची पोलिस कोठडी

नवी दिल्ली ः दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे स्वीय सहाय्यक बिभव कुमार यांना आपच्या राज्यसभा खासदार स्वाती मालीवाल यांच्यावर प्राणघातक

उन्नाव बलात्कार पीडितेची आई लढणार निवडणूक
अभियंते संपावर…आजचा वीजपुरवठा संकटात…केंद्र सरकारच्या वीज सुधारणा विधेयकाला वाढता विरोध
भारतावर आरोप करणं भोवलं; जस्टिन ट्रुडोंची लोकप्रियता घटली!

नवी दिल्ली ः दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे स्वीय सहाय्यक बिभव कुमार यांना आपच्या राज्यसभा खासदार स्वाती मालीवाल यांच्यावर प्राणघातक हल्ला केल्याप्रकरणी 5 दिवसांच्या पोलिस कोठडीत पाठवण्यात आले आहे. शनिवारी सायंकाळी साडेचार वाजता बिभवला अटक करण्यात आली. रात्री उशिरा त्यांना तीस हजारी न्यायालयात हजर करण्यात आले. दिल्ली पोलिसांनी बिभवला 7 दिवसांची कोठडी मागितली होती. दिल्ली पोलिसांच्या वतीने वकील अतुल श्रीवास्तव यांनी बिभवच्या कोठडीबाबत युक्तिवाद केला. बिभवला 23 मे रोजी न्यायालयात हजर केले जाणार आहे.

COMMENTS