Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

भूषण देसाईंचा शिवसेनेत प्रवेश

सुभाष देसाईंच्या मुलाने ठाकरे गटाची सोडली साथ

मुंबई/प्रतिनिधी ः ठाकरे गटाचे निष्ठावान नेते माजी उद्योगमंत्री सुभाष देसाई यांचे पुत्र भूषण देसाई यांनी सोमवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उ

पालकाने घेतला शिक्षकाला चावा
वाहतूक नियमांच्या उल्लंघनासंबंधी नऊ हजार प्रकरणे दाखल
केरळमध्ये मोठा स्फोट, एकाचा मृत्यू, 35 जण जखमी!

मुंबई/प्रतिनिधी ः ठाकरे गटाचे निष्ठावान नेते माजी उद्योगमंत्री सुभाष देसाई यांचे पुत्र भूषण देसाई यांनी सोमवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये शिवसेनेमध्ये प्रवेश केला. त्यामुळे सुभाष देसाई यांच्या घरामध्येच फूट पडल्याचे दिसून येत आहे. सुभाष देसाई ठाकरे गटासोबत तर पूत्र भूषण देसाई शिवसेनेसोबत असल्याचे दिसून येत आहे.
शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर भूषण देसाईंंनी प्रतिक्रिया देताना सांगितले की, बाळासाहेब हेच माझे दैवत आणि शिवसेना या दोन शब्दांना सोडून तिसरे काही माझ्यासमोर आलेले मला आठवत नाही. ते पुढे म्हणाले की, हिंदूत्वाचा विचार राज्यासाठी साहेबांनी पाहिलेले स्वप्न जर कोणी पुढे घेऊन जात असेल तर शिवसेना भाजप युतीचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुढे घेऊन जात आहेत. म्हणून माझा त्यांच्यावर विश्‍वास आहे. मी त्यांच्यासोबत जवळून काम केले आहे. त्यांचा वेग आणि क्षमता मी जवळून अनुभवल्यामुळे मी त्यांच्या पाठीशी उभे राहण्याचा निर्णय घेतला आहे. एक छोटा कार्यकर्ता होतो. प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष सामाजिक कार्य करत होते, पण शिंदे साहेबांना बघत त्यांच्यावरून प्रेरित होऊन त्यांच्याबरोबर राहण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, असे भूषण देसाई म्हणाले. आदित्य ठाकरेंच्या टीकेवरही भूषण देसाई यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. ’त्यांच्यासाठी मी खूप लहान आहे. मी त्याकाळात काम केले आहे. माझे सामाजिक काम आहे, ते त्यांना कळेल. मी निवडणूक किंवा कोणत्याही पदासाठी इथे आलेलो नाही. पक्ष जी जबाबदारी देईन, ती मी स्वीकारणार आहे,’ असे वक्तव्य भूषण देसाई यांनी केले आहे.

COMMENTS