Homeताज्या बातम्यासंपादकीय

ओबीसींचा सौदागर भुजबळांनी बाज यावे ! 

 छगन भुजबळ हे नाव म्हणजे ओबीसी नावाचा बनाव! १९९१ पर्यंत या माणसाची प्रतिमा निव्वळ हिंदुत्ववादी होती. ओबीसी या संकल्पनेची जाणीवही तोपर्यंत नस

मराठा समाजाला सोबत घेणं, ही मोदींची गरज नाही ! 
पुरस्कार वापसी आणि संसदीय समिती ! 
अधिक आणि अधिक राजकारणात वजाही होते !

 छगन भुजबळ हे नाव म्हणजे ओबीसी नावाचा बनाव! १९९१ पर्यंत या माणसाची प्रतिमा निव्वळ हिंदुत्ववादी होती. ओबीसी या संकल्पनेची जाणीवही तोपर्यंत नसलेले भुजबळ, मंडलोत्तर काळात एकाएकी स्वयंघोषित ओबीसी नेते असल्याचा बनाव करू लागले. ओबीसी म्हणवून घेत असताना ओबीसींना राजकीय, सामाजिकदृष्ट्या उध्वस्त करणारे भुजबळ हे खरेतर ओबीसींचे शत्रू आहेत. मराठा समाजाला सत्ताधारी बनविण्यासाठी सतत उतावीळ असणारे भुजबळ, हे ओबीसी चळवळीचे सौदागर आहेत.‌ महाराष्ट्रात नुकतेच मराठा आरक्षणाचे आंदोलन शमले आहे. मात्र, या आंदोलनाचा सर्वाधिक गैरफायदा घेणारं जर का कोणी असेल, तर, भुजबळ हेच आहेत, कोणालाही शंका असण्याचे कारण नाही. महाराष्ट्रात ऐंशीच्या दशकात माधव सेना म्हणजे माळी, धनगर, वंजारी या ओबीसी जातींचा प्रयोग संघाने सुरू केला होता. हा प्रयोग आता इतिहासजमा झाला आहे. परंतु, अनेक प्रकरणात जामिनावर असलेल्या भुजबळांची स्मरणशक्ती एवढी कच्ची आहे की, त्यांना पन्नास वर्षांपूर्वीचा माधव पॅटर्न आठवतो परंतु, सध्या त्यांच्या विरोधात सुरू असलेल्या न्यायालयीन खटल्यांचे त्यांना स्मरण होत नाही. अंजली दमानिया यांनी भुजबळांच्या स्मरणशक्तीला आव्हान देत, महाराष्ट्र सदन प्रकरणी त्यांना पुन्हा न्यायालयात उभे राहण्यास बाध्य केले आहे. भ्रष्टाचारी नेत्यांचा कर्दनकाळ असलेले देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी यांना आम्ही आवाहन करतो की, त्यांनी ओबीसींचे खरे विरोधक असलेल्या छगन भुजबळ यांचा बंदोबस्त करावा. ईडी, सीबीआय या यंत्रणांकडून अनेक चौकश्या सुरू असलेल्या भुजबळांना बंदिस्त करून त्यांनी, ओबीसी समुदायावर उपकार करावेत, अशी आमची पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी यांना विनंती आहे. 

       नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघ हा ओबीसी समाजाचा बालेकिल्ला आहे. या मतदारसंघात खऱ्या ओबीसींनी निवडणूक रिंगणात उतरण्याचे नुसते जाहीर केले तरी, भुजबळांच्या बुडाला आग लागते. या मतदारसंघात मायक्रो ओबीसींचे प्राबल्य असताना भुजबळ माधव सेना असल्याचे धादांत खोटे सांगून मराठा नेत्यांशी सौदेबाजी करतात. मराठा आरक्षण आंदोलनाने ओबीसींमधून आरक्षण घेण्यासाठी जे मराठा-कुणबी प्रमाणपत्र घेण्याचा जो सपाटा लावला आहे, त्याविरोधात महाराष्ट्रातील ओबींसी एक झाला आहे. मात्र, ओबीसींचा सामुहिक निर्णय बदलण्यासाठी भुजबळांनी मराठा समाजाची सुपारी घेतल्याचे लोकसभा निवडणुकीच्या उंबरठ्यावर स्पष्ट झाले आहे. तेली, धोबी, न्हावी, सुतार, गुरव, सोनार, कोळी, भावसार, शिंपी, बेलदार, पोटजाती-लेवा कुणबी, लेवा पाटील, लेवा पाटीदार, कासार, लोणारी पिंजारी, मन्सुरी, विनकर, कलाल, लोहार, कराडी, दोडे गुजर, पेंढारी, यलमार, दोरीक, परदेशी अशा कितीतरी जाती आहेत, ज्या मिळून नगर दक्षिण मतदारसंघात आपलं प्राबल्य राखून आहेत. या बहुसंख्य असणाऱ्या जाती राजकीयदृष्ट्या प्रतिनिधित्व करण्यास या जातींपैकी कोणी समोर आल्याबरोबर भुजबळ सारख्या ओबीसी विरोधी नेत्याला, ओबीसी नेता असण्याचा पुळका येतो, हे त्यांच्या १९९१ च्या राजकारणात सातत्याने दिसत आहे. आमचे अनेक ओबीसी विचारवंत नेत्यांनी हिंदुत्ववादी असलेल्या अनेक राजकीय नेत्यांना मंडलोत्तर काळात ओबीसी असण्याचा साक्षात्कार झाला. अर्थात, हा साक्षात्कार त्यांच्या राजकीय मालकांनी त्यांना करून दिला. मात्र, आम्ही भुजबळांना ठासून सांगतो की, आता, मायक्रो ओबीसी जाती राजकीयदृष्ट्या जागृत झाल्या असून त्यांना माधव सेना सारख्या कालबाह्य संकल्पना पुन्हा उगाळून रोखता येणार नाही. शरद पवार आणि मराठा नेत्यांचे मांडलिकत्व स्वीकारलेल्या भुजबळांनी आता ओबीसी मध्ये लुडबुड करण्याच्या फंदात पडू नये. गेली पन्नास वर्षे सत्तेचा मलिदा खाणारे भुजबळ त्यातील ३५ वर्षे म्हणजे १९९१ पासून ओबीसींचा मलिदा ओरबाडत आहेत. नगर दक्षिण मतदारसंघात काय करावयाचे याचा निर्णय ओबीसींनी घेतला आहे. त्यात लुडबुड करण्यापासून भुजबळांनी बाज यावे, अन्यथा, ओबीसींचे नुकसान करून मराठा समाजाला ताकदवर करणाऱ्या भुजबळांना ओबीसी पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी माफ करणार नाहीत, याचा आम्हाला पूर्ण विश्वास आहे.

COMMENTS