Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

सिल्लोड ,शहरातील नगर परिषद प्रशालेच्या मैदानाचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांच्याहस्ते भूमीपूजन

औरंगाबाद प्रतिनिधी- कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांच्या संकल्पनेतून येत्या 1 जानेवारी पासून सिल्लोड येथे ' राज्यस्तरीय सिल्लोड महोत्सव 2023  चे आ

 शहराला छत्रपती संभाजीनगर नावाशिवाय दुसर कोणतं नाव देता येणार नाही – आ. प्रदिप जैस्वाल 
राज ठाकरेंकडे शिंदे गटाचा युतीचा हात ?
समृद्धीवरील अपघातात 12 जणांचा मृत्यू

औरंगाबाद प्रतिनिधी– कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांच्या संकल्पनेतून येत्या 1 जानेवारी पासून सिल्लोड येथे ‘ राज्यस्तरीय सिल्लोड महोत्सव 2023  चे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवात कृषी, कला आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचा समावेश असणार आहे.  सिल्लोड महोत्सव अंतर्गत नगर परिषद प्रशालेच्या मैदानात सर्व सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहे. प्रसिद्ध संगीतकार व गायक, अजय – अतुल, आदर्श शिंदे, वैशाली सामंत, अवधूत गुप्ते आदी कलाकार याच मैदानावर आपले सादरीकरण करणार असून प्रसिद्ध कीर्तनकार निवृत्ती महाराज इंदोरीकर यांचे कीर्तन या ठिकाणी होणार आहे. यासह चला हवा येऊ द्या, फु बाई फु, महाराष्ट्राची हास्य जत्रा तसेच चांद कादरी व छोटी तमन्ना यांच्या कव्वालीचा मुकाबला आणि मुशयरा या ठिकाणी पहायला मिळणार आहे. या कार्यक्रमास प्रसिद्ध अभिनेता प्रसाद ओक, अभिनेत्री सोनाली कुलकर्णी, माधुरी पवार, मानसी नाईक यांच्यासह कॉमेडीयन सुनील ग्रोवर, जावेद अली हे कलाकार उपस्थित राहणार आहेत. आतापर्यंतच्या इतिहासात इतका भव्य स्वरूपाचा महोत्सव पहिल्यांदा होणार आहे. या कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे अवाहन मंत्री अब्दुल सत्तार यांनी केले आहे.

COMMENTS