Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मुंबई पोलिसांकडून भोजपुरी अभिनेत्रीला अटक

मुंबई : मुंबई पोलिसांनी एका हायप्रोफाईल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. याप्रकरणी छापा टाकल्यानंतर एका भोजपुरी अभिनेत्रीलाही अटक करण्यात आली आहे

भगवान जगन्नाथ यांच्या 144 व्या रथ यात्रेस मंजूरी l
शेवटी आईच काळीज! Filmy Masala
अहिल्यानगर जिल्ह्याच्या स्वीप उपक्रमाचा जागतिक स्तरावर गौरव

मुंबई : मुंबई पोलिसांनी एका हायप्रोफाईल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. याप्रकरणी छापा टाकल्यानंतर एका भोजपुरी अभिनेत्रीलाही अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुमन कुमारी नावाची ही भोजपुरी अभिनेत्री एका हायप्रोफाईल सेक्स रॅकेटमध्ये एजंट म्हणून काम करत होती. मुंबई पोलिसांच्या समाजसेवा शाखेने ही कारवाई केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबईतील आरे कॉलनी परिसरातील रॉयल पाम हॉटेलमध्ये सेक्स रॅकेटची माहिती मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी एका बनावट ग्राहकाला भोजपुरी अभिनेत्री सुमन कुमारीकडे पाठवले. सुमन कुमारीने त्या बनावट ग्राहकाशी डील केली, ज्यामध्ये प्रत्येक मॉडेलसाठी 50 ते 80 हजार रुपये मागितले. यानंतर पोलिसांनी हॉटेलच्या खोलीवर छापा टाकला आणि सुमन कुमारीला अटक केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भोजपुरी अभिनेत्री सुमन कुमारी ही मुंबईत सिनेमात करिअर करायला आलेल्या मॉडेल्सला हेरायची आणि या मॉडेल्सच्या मजबुरीचा फायदा घेत त्यांना वेश्या व्यवसायात ढकलायची. या कारवाईत पोलिसांनी तीन मॉडेल्सचीही सुटका केली आहे. सध्या पुढील तपास सुरू आहे.

COMMENTS