Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

कोरेगाव भीमामध्ये अभिवादनासाठी उसळला भीमसागर

पुणे : कोरेगाव भीमा या ठिकाणी बुधवारी 207 वा शौर्य दिनानिमित्त अभिवादनासाठी भीमसागर उसळला होता. यंदा किमान 8-10 लाख अनुयायांनी या विजय स्तंभास अभ

झारखंडचे सोरेन सरकार बहुमत चाचणीत पास
अल्पवयीन मुलीवर अत्याचार, बाळाला दिला जन्म | LOKNews24
मुंबईमधील अवकाळी पावसाचा मच्छीमारांना फटका

पुणे : कोरेगाव भीमा या ठिकाणी बुधवारी 207 वा शौर्य दिनानिमित्त अभिवादनासाठी भीमसागर उसळला होता. यंदा किमान 8-10 लाख अनुयायांनी या विजय स्तंभास अभिवादन केले. वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर, रिपाइंचे नेते तसेच सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले तसेच राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी विजय स्तंभास अभिवादन केले.
मध्यरात्रीपासूनच विजय स्तंभास अभिवादन करण्यासाठी लोकांची मोठी गर्दी पहायला मिळत आहे. 207 वर्षांपूर्वी कोरेगाव भीमा इथे लढाई झाली होती. कोरेगाव भीमा येथे 1 जानेवारी 1818 ला इंग्रज आणि पेशव्यांमध्ये झालेले युद्ध प्रसिद्ध आहे. या युद्धात महार रेजिमेंटमधील सैनिकांनी पेशव्यांविरोधात लढाईत दाखवलेल्या अतुलनीय शौर्यामुळं इंग्रजांना विजय मिळवता आला. त्या विजयाचे प्रतीक म्हणून इंग्रजांनी कोरेगाव भीमामध्ये जयस्तंभ उभारला. तेव्हापासून या जयस्तंभाजवळ शौर्य दिन साजरा केला जातो आहे. 1 जानेवारी 1927 ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी या विजय स्तंभास भेट देऊन हा इतिहास पुढे आणला. तेव्हापासून या ठिकाणी शौर्य दिवस साजरा करण्यास सुरुवात झाली. प्रकाश आंबेडकर म्हणाले की, भीमा कोरेगावचा संघर्ष प्रत्यक्षात संपला आहे तरी मानसिकरित्या अजून तो चालू आहे. मानसिक संघर्ष या देशात जो पर्यंत चालत राहिल तो पर्यंत मानवतेची प्रतीके आहेत तिथे अभिवादन करण्यासाठी लोक येत राहतील मानवतेच्या बाबतीत आपली प्रतिबद्धता ते दाखवत राहतील असे मी मानतो, असे प्रकाश आंबेडकर म्हणाले.

परिसरात ड्रोन कॅमेर्‍यांची नजर
कोरेगाव भीमा परिसरातील गर्दीवर सीसीटीव्ही आणि ड्रोन कॅमेर्‍यांची नजर ठेवण्यात आली आहे. कोरेगाव भीमा येथे जयस्तंभ अभिवादन सोहळ्याच्या पार्श्‍वभूमीवर पुणे पोलिसांकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने प्रशासनाकडूनही योग्य ती तयारी करण्यात आली असून, प्रशासनाकडून योग्य ती खबरदारी घेतली जात आहे.

COMMENTS