Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

भीमसैनिकाच्या वतीने परभणीच्या घटनेचा अहिल्यानगर शहरात केला निषेध

अहिल्यानगर : परभणी येथील भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळील संविधान प्रतिमेची मोडतोड करणाऱ्या समाजकंटकास व इतर गुन्हेगारास देशद्र

नगरमधील नव्या पत्रकारांना घरांसाठी जागा द्या ; डॉ. सोनवणेंची आ. जगतापांकडे मागणी
पुणतांबा ग्रामपंचायतीसाठी तिरंगी लढत
लोकजीवनातील भीती गांधी मार्गाने दूर करण्याची गरज : अरुण खोरे

अहिल्यानगर : परभणी येथील भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळील संविधान प्रतिमेची मोडतोड करणाऱ्या समाजकंटकास व इतर गुन्हेगारास देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून अटक करण्यात यावी व पोलीस कस्टडीमध्ये मृत्यू पावलेला सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मारेकऱ्यास चौकशी करून अटक करण्यात यावी व मनुष्यवादाचा गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी रिपाई आंबेडकर पक्ष व समस्त भीमसैनिकाच्या वतीने शहरातून मोर्चा काढण्यात आला व कोतवाली पोलीस स्टेशन येथील पोलीस निरीक्षक यांना निवेदन रोहित आव्हाड यांच्या नेतृत्वाखाली देण्यात आले यावेळी समाज बांधव व भीमसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पुढे निवेदनात म्हटले आहे की, परभणी येथे विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळील संविधान प्रतिमेची तोडफोड करून समस्त आंबेडकरी अनुयायाची भावना दुखावली गेली. व एलएलबी शिक्षण घेणाऱ्या व शांततेच्या माध्यमाने आंदोलन करणाऱ्या सोमनाथ सूर्यवंशी या भीमसैनिकास ताब्यात घेऊन त्याला अटक केली व त्यास अमानुषपणे मारहाण करण्यात आली व त्याचा पोलीस कस्टडीमध्ये मृत्यू झाला त्यामुळे मारहाण करणाऱ्या पोलिसांवर तात्काळ चौकशी करून कारवाई करण्यात यावी व मनुष्यवादाचा गुन्हा दाखल करण्यात यावा व सूर्यवंशी यांच्या कुटुंबीयांना ५० लाख रुपये शासनाने मदत जाहीर करावी व कुटुंबीयांचे पुनर्वसन करण्याची मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

COMMENTS