भविष्यात शिवसेनेसोबत युती शक्य : अ‍ॅड. आंबेडकर

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

भविष्यात शिवसेनेसोबत युती शक्य : अ‍ॅड. आंबेडकर

अकोला/प्रतिनिधी :काँगे्रससोबत युती करण्यासाठी प्रस्ताव देऊन देखील यावर चर्चा होऊ शकलेली नाही. त्यामुळे वंचित बहुजन आघाडीचे नेते अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर

सामाजिक मागासलेपणाचा संदर्भ चुकीचा ः सदावर्ते
मुस्लीम तरुणीसोबत प्रेमप्रकरण, दलित तरुणाची निर्घृण हत्या | LokNews24
डॉ. सुनील शिंदे यांच्या ‘अगस्त्यकांता लोपामुद्रा’ या गौरवस्तोत्राचे प्रकाशन

अकोला/प्रतिनिधी :काँगे्रससोबत युती करण्यासाठी प्रस्ताव देऊन देखील यावर चर्चा होऊ शकलेली नाही. त्यामुळे वंचित बहुजन आघाडीचे नेते अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी युतीसाठी थेट शिवसेनेला साद घातली आहे. आपण शिवसेनेबाबत सकारात्मक असून, भविष्यात शिवसेनेशी युती होऊ शकते, असे वक्तव्य अ‍ॅड आंबेडकर यांनी अकोल्यात केले. आंबेडकर यांच्या मैत्रीच्या प्रस्तावाला शिवसेना काय उत्तर देते याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
आंबेडकरांच्या यातून भविष्यात नव्या समिकरणाची चाचपणी सुरु केल्याचे बोलले जात आहे. सध्या काँग्रेससोबतची आंबेडकरांची आघाडीची चर्चा पुढे जात नसल्याने आंबेडकरांनी मैत्रीसाठी सेनेला चुचकारल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे आंबेडकरांनी यातून शिवसेनेला राज्यात नव्या ’शिवशक्ती-भीमशक्ती’च्या समीकरणासाठी साद घातली काय?, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे.
राज ठाकरेंनी काल (12 एप्रिल) ठाण्यात केलेल्या मशिदीवरील भोंग्यांसंदर्भात केलेल्या भडकाऊ भाषणावर आंबेडकरांनी टीका केली आहे. हनुमान चालीसा ज्याला म्हणायची, गायची आहे, तो त्यांचा अधिकार आहे. मात्र, राज ठाकरेंनी मशिदीसमोर भोंगे लावून हनुमान चालीसा पठणाची भूमिका दंगल घडवण्याची असल्याचं आंबेडकर म्हणाले. गृहमंत्र्यांनी वेळ न दडवता राज ठाकरेवर कारवाई करावी. मात्र, राज्य सरकार यासाठी जाणीवपूर्वक कारवाईसाठी वेळ लावत असल्याचा आरोप आंबेडकरांनी केला आहे.
राज्यावरचे वीज संकट हे सरकारचे अपयश असल्याचे प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे. सरकारला हा प्रश्‍न सोडवता येत नसेल तर राजीनामा देत नव्या सरकारकडे प्रश्‍न सोपवावा, असा टोला आंबेडकरांनी लगावला. मंत्र्यांचे बंगले वाढत असतांना महावितरणचे खिसे खाली कसे होतात?, असा प्रश्‍न विचारत आंबेडकरांनी भारनियमनाच्या मुद्द्यावर ऊर्जामंत्री नितीन राऊंतांना टोला लगावला आहे. एसटी कामगारांनी विनाअट आता कामावर रुजू व्हावे. एसटी महामंडळ राज्य शासनात विलीन होऊ शकत नाही. मात्र, बाकी मागण्यासंदर्भात आम्ही एसटी कामगारांसोबत असल्याचे आंबेडकर म्हणाले. या संदर्भात गुणरत्न सदावर्तेंनी एसटीचे आंदोलन भरकटवल्याचे आंबेडकर म्हणाले.

विश्‍वास नांगरे पाटील यांना निलंबित करा
राष्ट्रवादी काँगे्रसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या बंगल्यावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी मुंबईचे पोलिस सहआयुक्त विश्‍वास नांगरे पाटील यांना निलंबित करण्याची मागणी प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे. मुंबईचे अतिरिक्त आयुक्त निशित मिश्रा यांनी या हल्ल्याच्या शक्यतेसंदर्भात सहआयुक्त विश्‍वास नांगरे पाटलांना एक पत्र लिहिले होते. या पत्राचे काय झाले असा सवाल आंबेडकरांनी विचारला आहे.

COMMENTS