Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

भाऊसाहेब उमाटे यांनी उलघडला मुक्तिसंग्रामाचा इतिहास

लातूर प्रतिनिधी - मराठवाडा मुक्तिसंग्रामाची शौर्यगाथा शालेय विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी लातूर जिल्हा परिषदेचा माध्यमिक शिक्षण विभाग, जिल्

’आप’ च्या शैली ओबेरॉय दिल्लीच्या नव्या महापौर
पर्यटन विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही… उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आश्वासन
प्रवासासाठी आवश्यक क्यूआर कोड पडताळणी राज्यानेच करावी : रावसाहेब दानवे

लातूर प्रतिनिधी – मराठवाडा मुक्तिसंग्रामाची शौर्यगाथा शालेय विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी लातूर जिल्हा परिषदेचा माध्यमिक शिक्षण विभाग, जिल्हा माहिती कार्यालय आणि बाबासाहेब परांजपे फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने ‘शौर्यगाथा मराठवाडा मुक्तिसंग्रामाची’ ही 75 व्याख्यानांची व्याख्यानमाला आयोजित करण्यात आली आहे. या अंतर्गत मराठवाडा मुक्तिसंग्रामाचे अभ्यासक तथा इतिहास संशोधक भाऊसाहेब उमाटे यांचे व्याख्यान बुधवारी हरंगुळ येथील जनकल्याण निवासी विद्यालयात आयोजित करण्यात आले होते.
जनकल्याण निवासी विद्यालायचे मुख्याध्यापक ज्ञानेश्वर सोनटक्के, व्याख्यानमालेचे समन्वयक दिलीप कानगुले, विद्यालयाचे अधीक्षक दत्ताभाऊ माने यावेळी उपस्थित होते. मराठवाडा मुक्तिसंग्रामाची सुरुवात, स्वातंत्र्य सैनिकांनी उभारलेले लढे, लातूर जिल्ह्यात घडलेल्या घटना आणि त्यामध्ये स्वातंत्र्य सैनिकांनी दिलेले योगदान आदी विषयांवर मार्गदर्शन करुन उमाटे यांनी विद्यार्थ्यांसमोर मराठवाडा मुक्तिसंग्रामाच्या लढ्यातील विविध प्रसंग उलघडून सांगितले. विद्यार्थी, शिक्षक यावेळी उपस्थित होते.

COMMENTS