Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

भातकुडगाव फाटा कडकडीत बंद

 शेवगाव - नेवासा राजमार्गावरील भातकुडगाव फाटा चौफुल्यावरील व्यापारी वर्गानी स्वयंस्फूर्तीने बंद पाळून मराठ्यांची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अ

नागवडे कारखान्याला ऊस पुरवठा करणार्‍या शेतकर्‍यांचे देयके अदा
रेल्वेस्थानकात अनोळखी पुरुषाचा मृतदेह आढळला
राहुरी तालुक्यात आढळला वृद्ध महिलेचा विवस्त्र मृतदेह

 शेवगाव – नेवासा राजमार्गावरील भातकुडगाव फाटा चौफुल्यावरील व्यापारी वर्गानी स्वयंस्फूर्तीने बंद पाळून मराठ्यांची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अंतरवाली सराटी येथे क्रांतीसुर्य मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांचे मराठा आरक्षणासंदर्भात काढलेल्या अध्यादेशाची अंमलबजावणी व्हावी या प्रमुख मागणीसह अन्य मागण्याकरिता आमरण उपोषण सुरू केले आहे. व आमरण उपोषणाचा आजचा पाचवा दिवस आहे. मनोज दादा जरांगे पाटील यांची प्रकृती खालावत चालली आहे.सरकारने काढलेल्या अध्यादेशाची त्वरित अंमलबजावणी करून जरांगे पाटील यांचे उपोषण स्थगित करावे. या मागणीसाठी शेवगाव तालुक्यातील भातकुडगाव फाटा येथे व्यापारी वर्गानी स्वयंस्फूर्तीने बंद पाळुन पाठिंबा दर्शवला आहे. यापूर्वीही शेवगाव तालुक्यात सर्वात प्रथम मनोज जरांगे पाटील यांनी उभारलेल्या मराठा आंदोलनाला पाठिंबा देऊन भातकुडगाव फाटा या चौफुल्यावर साखळी व आमरण उपोषण करून भातकुडगाव फाटा परिसरातील तरुणांनी पाठिंबा दिला होता.भातकुडगाव फाटा येथे शांततेच्या मार्गाने स्वयंस्फूर्तीने बंद पाळुन व्यापारी वर्गासह सकल मराठा समाजाच्या वतीने निषेध व्यक्त करण्यात आला आहे.

        महाराष्ट्र शासनाने मराठा आरक्षणाच्या काढलेल्या अध्यादेशाची अंमलबजावणी करून कायद्यात रूपांतर करावे व मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांचे आमरण उपोषण स्थगित करावे. महाराष्ट्रातील मराठा समाजाच्या नजरा अंतरवाली सराटीकडे आहेत याचे भान सरकारने ठेवावे.सगे सोयऱ्यांच्या आदेशाची अंमलबजावणी करावी. व मराठा समाजाला न्याय द्यावा यापुढे मराठा समाजाचा सरकारने अंत पाहू नये.अशा भावना व्यापारी वर्गासह मराठा समाजाच्या तरुणांनी व्यक्त केल्या.

COMMENTS