Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

भारत संकल्प यात्रेचे धोत्रे गावात जोरदार स्वागत

कोपरगाव शहर ः केंद्र शासन व राज्य शासनाच्या विविध समाजपयोगी शासकीय योजनांची माहिती जनसामान्यांना माहिती व्हावी याकरिता आयोजित भारत संकल्प यात्रेच

लायन्स क्लब कोपरगावच्या अध्यक्षपदी अ‍ॅड. मनोज कडू
Ahmednagar : जिल्ह्यात निर्बंध शिथिल.. ‘या’ वेळेपर्यंत दुकाने सुरू ठेवता येणार I LOK News 24
रेमडेसिविर इंजेक्शनचा अतिरेक व अनावश्यक वापर टाळावा – पालकमंत्री हसन मुश्रीफ यांचे आवाहन

कोपरगाव शहर ः केंद्र शासन व राज्य शासनाच्या विविध समाजपयोगी शासकीय योजनांची माहिती जनसामान्यांना माहिती व्हावी याकरिता आयोजित भारत संकल्प यात्रेचे कोपरगाव तालुक्यातील धोत्रे गावात आगमन झाले असता गावातील ग्रामस्थांनी व विद्यार्थ्यांनी या रथाचे जल्लोषात या स्वागत केले.
या आगमनाप्रित्यर्थ शालेय विद्यार्थिनी लेझीम नृत्य करत संपूर्ण गावातून थाटात मिरवणूक काढली. याप्रसंगी सरपंच प्रदीप चव्हाण, सामाजिक कार्यकर्ते सुरेश जाधव, उपसरपंच भगवान चव्हाण, ग्रामपंचायत सदस्य कैलास चव्हाण, नामदेव चव्हाण, भाऊसाहेब गागरे, मच्छिंद्र गायकवाड, विजय जामदार, ग्रामविकास अधिकारी अविनाश पगारे, तलाठी वाघ भाऊसाहेब, नुसा मिस्तरी, शिवबा प्रतिष्ठानचे अध्यक्ष पवन चव्हाण, पोलीस पाटील माळवदे, विजयपंत चव्हाण, ह.भ.प बाबासाहेब पाडेकर, पुंजाराम पाडेकर, संजय जानराव, बचत गटाच्या कांबळे ताई, शोभा जाधव यांच्यासह आरोग्य सेवक, आशा सेविका, वीरभद्र विद्यालयाचे मुख्याध्यापक,शिक्षक ,विद्यार्थी, ग्रामपंचायत कर्मचारी, ग्रामस्थ, महिला बचत गटाच्या सदस्या मोठ्या संख्येने उपस्थित होते. भारत संकल्प रथातील चित्रफितीच्या माध्यमातून उपस्थित सर्वांना केंद्र शासन व राज्य शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांची चित्रफितीद्वारे माहिती व महत्व सांगण्यात आले.याप्रसंगी प्रधानमंत्री योजनेअंतर्गत घरकुल, उज्वला गॅस, किसान सन्मान योजना आदी शासकीय योजनेचे लाभ घेतलेल्या लाभार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. तर अहमदनगर जिल्हा बँकेचे तालुका विकास अधिकारी काटे साहेब यांनी देखील बँकिंग कामकाजाविषयी, शेतकर्‍यांच्या लाभाच्या योजनेविषयी व पीक कर्जाविषयी माहिती दिली.सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शालेय शिक्षक रोकडे यांनी तर उपस्थितांचे आभार ग्रामविकास अधिकारी पगारे यांनी व्यक्त केले.

COMMENTS