इस्लामपूर / प्रतिनिधी : येलूर (ता. वाळवा) येथे भारत जोडो यात्रे संदर्भात डिजिटल स्क्रीन द्वारे गावोगावी जाऊन थेट प्रक्षेपण करून जनजागृती करणार्
इस्लामपूर / प्रतिनिधी : येलूर (ता. वाळवा) येथे भारत जोडो यात्रे संदर्भात डिजिटल स्क्रीन द्वारे गावोगावी जाऊन थेट प्रक्षेपण करून जनजागृती करणार्या व्हॅनचे काँग्रेसचे युवा नेते संदिप जाधव यांनी स्वागत केले.
संदिप जाधव म्हणाले, केंद्रातल्या भाजप सरकारच्या निष्क्रिय राज्यकारभारा विरोधात जुलमी व हुकूमशाही राजवटीत विरोधात काँग्रेसचे व देशाचे युवा नेते राहुल गांधी यांनी सुरू केलेल्या देशव्यापी कन्याकुमारी ते जम्मू काश्मीर 3500 की. मी. भारत जोडो यात्रा सुरू आहे. ही यात्रा देश वाचवण्यासाठी, देशाचे संविधान वाचवण्यासाठी, देशाची लोकशाही वाचवण्यासाठी, देशाची एकता व अखंडता कायम राखण्यासाठी व देशहितासाठी व लोकहितासाठी असल्याची भावना लोकांच्या मनामध्ये आहे. देशाचे नागरिक मोठ्या आपुलकीने या यात्रेत सहभागी होत आहेत. या यात्रेला अभूतपूर्व प्रतिसाद मिळत आहे. संपूर्ण देशभरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. या यात्रेच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे नेते व राज्याचे माजी मंत्री डॉ. विश्वजीत कदम यांच्या संकल्पनेतून जिल्ह्यातील गावोगावी जाऊन डिजिटल स्क्रीनद्वारे जनजागृती करण्यात येत आहे
यावेळी अशोक पाटील, सुरेश पाटील, रमेश जाधव, माणिक जाधव, मदन पाटील, शामराव चव्हाण, दिलीप जाधव, श्रीकांत चव्हाण, बाळासाहेब जाधव, चंद्रकांत जाधव, बाबासो जाधव, तानाजी जाधव, रघुनाथ पाटील, संजय जाधव, महेश जाधव, नितीन जाधव, शिवाजी काळे, अजित जाधव, अनिल कुंभार यांच्यासह पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
COMMENTS