भाजप चालवतंय क्रिमिनल सिंडिकेट : संजय राऊत

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

भाजप चालवतंय क्रिमिनल सिंडिकेट : संजय राऊत

पंतप्रधान कार्यालयात सादर केले आर्थिक गैरव्यवहाराचे पुरावे

नवी दिल्ली/मुंबई ः राज्यात अंमलबजावणी संचालनालय अर्थात ईडीच्या कारवायांनी जोर धरला असून, राष्ट्रवादी काँगे्रसच्या नवाब मलिक यांच्या पाठोपाठ राष्ट्रवा

मालवाहू ट्रक आणि छोटा हत्ती यांची समोरासमोर धडक.
खाजगी सावकाराच्या जाचास कंटाळून हाँटेल चालकाचे पलायन
पारनेर तालुक्यातील अल्पवयीन मुलीचा संशयास्पद मृत्यू ; अत्याचारानंतर खून केल्याचा संशय

नवी दिल्ली/मुंबई ः राज्यात अंमलबजावणी संचालनालय अर्थात ईडीच्या कारवायांनी जोर धरला असून, राष्ट्रवादी काँगे्रसच्या नवाब मलिक यांच्या पाठोपाठ राष्ट्रवादीचे नेते अणि ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांची नागपूर आणि नगरची जमीन जप्त केली आहे. तसेच तनपुरे यांच्यावर अटकेची टांगती तलवार आहे. याविरोधात शिवसेना नेते संजय राऊत भाजप राज्यात क्रिमिनल सिंडिकेट चालवत आहेत का, असा गंभीर सवाल केला आहे.
गेल्या काही दिवसांमध्ये महाराष्ट्रात आरोप-प्रत्यारोपांचं राजकारण चांगलंच चर्चेत आलं होतं. आधी किरीट सोमय्या यांनी शिवसेना नेत्यांवर गंभीर आरोप केल्यानंतर त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी संजय राऊतांनी शिवसेना भवनावर पत्रकार परिषद घेऊन उलट किरीट सोमय्यांवरच आरोप केले. या सगळ्या प्रकारामुळे राज्यातलं राजकीय वातावरण तापलं होतं. आता या सगळ्याचा पुढचा अंक सुरू झाला असून शिवसेना खासदार संजय राऊत यांनी थेट पंतप्रधान कार्यालय गाठलं आहे. संजय राऊतांनी पंतप्रधान कार्यालयाकडे गैरव्यवहारांचे पुरावे सादर केले असून त्यासंदर्भात लवकरच मुंबईत पत्रकार परिषद घेणार असल्याचं राऊत म्हणाले आहेत. संजय राऊतांनी पंतप्रधान कार्यालयाकडे कागदपत्र सोपवल्यानंतर माध्यमांना दिलेल्या प्रतिक्रियेमध्ये केंद्रीय तपास यंत्रणांवर निशाणा साधला. केंद्र सरकारकडून कारवाईची अपेक्षा नाही. कारण केंद्रातल्या काही मोजक्या लोकांच्या आदेशांनुसार महाराष्ट्र आणि पश्‍चिम बंगालमध्ये या सूडाच्या कारवाया सुरू आहेत. महाराष्ट्रात जास्त. जणूकाही केंद्रीय तपास यंत्रणांना संपूर्ण देशात फक्त महाराष्ट्रातच काम आहे. महाराष्ट्रातच सर्वकाही घडतंय. महाराष्ट्राला, महाराष्ट्रातल्या नेत्यांना बदनाम करायचं. खोटी प्रकरणं, खोटे पुरावे उभे करायचे. अशी चिखलफेक सुरू आहे. पण जे चिखल फेकत आहेत, त्यांचे हात देखील किती बरबटलेले आहेत हेसुद्धा देशाला कळायला हवं, असं राऊत म्हणाले.
दरम्यान, पंतप्रधान कार्यालयाला पुरावे का सादर केले? याविषयी संजय राऊतांनी खुलासा केला आहे. यामागे कोणतं सिंडिकेट आहे, त्याबाबतची माहिती मी काल पंतप्रधान कार्यालयाकडे सुपूर्द केली आहे. हा रेकॉर्ड आहे की आम्ही तुम्हाला कळवलं आहे, पण तुम्ही त्यावर काहीही केलेलं नाही, असं राऊत म्हणाले.

COMMENTS