Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

भैरवनाथ विद्यालयात राष्ट्रीय बालिका दिन उत्साहात

निघोज/प्रतिनिधी ः पारनेर तालुक्यातील पुनेवाडी येथील भैरवनाथ या विद्यालयात ब्रिटानिया न्यूट्रिशन फाउंडेशन च्या वतीने राष्ट्रीय बालिका दिन मोठ्या उ

राहुरीत 2 जूनला अहिल्यादेवी होळकरांचा जयंती उत्सव सोहळा
मोबाईल टॉवरची अंतिम सुनावणी होईपर्यंत प्रेक्षपण राहणार बंद
लॉकडाऊन उपाय नाही”: प्रकाश आंबेडकर |

निघोज/प्रतिनिधी ः पारनेर तालुक्यातील पुनेवाडी येथील भैरवनाथ या विद्यालयात ब्रिटानिया न्यूट्रिशन फाउंडेशन च्या वतीने राष्ट्रीय बालिका दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आल्याची माहिती विद्यालयाचे मुख्याध्यापक गवळी यांनी दिली. ब्रिटानिया न्यूट्रिशन फाउंडेशन हे 2021 पासून प्रकल्प अधिकारी देविदास शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली शिरूर आणि पारनेर तालुक्यातील 20 हजार लाभार्थ्यांसोबत काम करत आहे.

या गावांमधील निवडक लाभार्थ्यांच्या आरोग्यामध्ये बदल घडवून आणणे व एक सशक्त व स्वस्थ भारत निर्माण करणे यासाठी संस्था काम करत असल्याचे फाउंडेशनच्या क्षेत्रीय अधिकारी मनीषा प्रधान यांनी आपले मत राष्ट्रीय बालिका  दिवसानिमित्त घेण्यात आलेल्या कार्यक्रमात व्यक्त केले. या प्रकल्पाअंतर्गत प्रामुख्याने परसबाग उभारणी, मुलांचे आरोग्य तपासणी, लोहयुक्त आहार वाटप ,स्वच्छता कीट वाटप करणे ,मुलामुलींसाठी वेळोवेळी आरोग्य संबंधित मार्गदर्शन कार्यक्रम घेणे, प्रत्येक महिन्यामध्ये विद्यार्थ्यांची वृद्धी निकष तपासणी जे विद्यार्थी कमी वजनाच्या आहेत त्यांचे वजन वाढवण्यासाठी संतुलित आहार पुरवणे असे उपक्रम विद्यालयात राबविण्यात येत असल्याने विद्यार्थी कुपोषित पासून सुपोषित बनण्यास मदत होत असल्याचे याप्रसंगी बोलताना विद्यालयाच्या प्राध्यापिका जावळे यांनी सांगितले. या कार्यक्रमात विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते रांगोळी ,चित्रकला, वकृत्व गायन स्पर्धा विद्यालयातील अनेक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला त्यामध्ये ब्रिटानिया न्यूट्रिशन फाउंडेशनच्या मनीषा प्रधान तसेच विद्यालयातील सरस्वती जावळे मॅडम यांनी बालिका दिनाचे उत्कृष्ट मार्गदर्शन केले तसेच पुजारी मॅडम यांनी सूत्रसंचालन केले तसेच रेपाळे मॅडम यांनी आभार व्यक्त केले आणि खूप उत्साहात आनंदात बालिका दिन साजरा झाला. यावेळी विद्यालयाचे प्राध्यापक राजेंद्र लांडे सर आवारी, गाडेकर, चेडे, ठुबे तसेच ग्रामपंचायत सदस्य नीलम बाळू पोटे, छाया राजेंद्र लांडे उपस्थित होते.

COMMENTS