संगमनेर : संगमनेर तालुक्यातील रहिमपूर येथील प्रगतशील शेतकरी तथा सामाजिक कार्यकर्ते भागवतराव देवराम शिंदे पाटील (वय 86) यांचे नुकतेच वृद्धापकाळाने
संगमनेर : संगमनेर तालुक्यातील रहिमपूर येथील प्रगतशील शेतकरी तथा सामाजिक कार्यकर्ते भागवतराव देवराम शिंदे पाटील (वय 86) यांचे नुकतेच वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले. रहिमपूर आणि परिसरातील धार्मिक आणि सामाजिक कार्यक्रमात स्व.भागवतराव शिंदे यांचा सहभाग असायचा.त्यांना या परिसरात भाऊ या नावाने ओळखले जायचे. अतिशय शांत,सुस्वाभावी आणि प्रेमळ स्वभाव असणार्या स्व.भागवतराव शिंदे यांच्या पश्चात मुले चंद्रकांत, बाळासाहेब, संदीप, मुलगी गं.भा शकुंतला, सुना, भाऊ, भावजया, पुतणे, पुतण्या नातू, पणतू असा मोठा परिवार आहे.रहिमपूर विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीचे माजी चेअरमन पत्रकार चंद्रकांत शिंदे पाटील यांचे ते वडील होत. त्यांच्या निधनाने परिसरातुन हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
COMMENTS