Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

प्राणायाम व ध्यान पूजा सर्वश्रेष्ठ ः स्वामी ब्रम्हचैतन्य

राहाता ः प्राणायाम व ध्यान सर्वश्रेष्ठ पूजा आहे, ध्यानामुळे उपासना होते प्रसन्न मनाने ध्यान व प्राणायाम ही पूजा करावी भगवान शिव आपल्या सर्व कामना

शहरटाकळी विद्यालयामध्ये इको फ्रेंडली राख्या बनवा कार्यशाळेचा समारोप
संजीवनी अभियांत्रिकीच्या 60 विद्यार्थ्यांची इन्फोसिसमध्ये निवड
स्मशानभूमीतील ती लोखंडी जाळीही चोरट्यांनी चोरली

राहाता ः प्राणायाम व ध्यान सर्वश्रेष्ठ पूजा आहे, ध्यानामुळे उपासना होते प्रसन्न मनाने ध्यान व प्राणायाम ही पूजा करावी भगवान शिव आपल्या सर्व कामना पूर्ण करतील असे सांगत गुरुदेव श्री श्री रविशंकर महाराज यांचा सुखी रहा खुश रहा असा आशीर्वाद रुपी संदेश स्वामी ब्रह्मचैतन्य जी यांनी भाविकांना दिला.
राहाता येथील श्री वीरभद्र मंदिराचे प्रांगणावर उभारलेल्या भव्य मंडपामध्ये श्रावण रुद्र पूजा व सत्संग सोहळ्यात स्वामीजी बोलत होते. आर्ट ऑफ लिव्हींगचे संस्थापक गुरुदेव श्री श्री रविशंकर महाराज यांचे प्रेरणा व आशीर्वादातून राहाता तालुका आर्ट ऑफ लिव्हींग चे सुनील सदाफळ व सदस्य ग्रुपच्या वतीने सोमवारी श्रावण रुद्र पूजा व श्रीकृष्ण जन्माष्टमीचा उत्सव साजरा करण्यात आला. या कार्यक्रमास राज्याचे महसूल मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील,खा. भाऊसाहेब वाकचौरे, हरिभक्त परायण उद्धव महाराज मंडलिक प्रांताधिकारी माणिक आहेर, ज्ञानेश्‍वर गोंदकर, पोलीस उपअधीक्षक शिरीष वमने,पोलीस निरीक्षक अरविंद जोंधळे, पुष्पाताई काळे, मुख्याधिकारी वैभव लोंढे, मुकुंद सदाफळ,दिलीपराव शिंदे (संगमनेर ),माजी नगराध्यक्ष कैलास सदाफळ, ड. बोठे आदी मान्यवर उपस्थित होते. स्वामी ब्रह्मचैतन्य म्हणाले की परमेश्‍वराला धन्यवाद देत राहा श्‍वास आपण घेत नाही तर श्‍वास निरंतर आहे. जे मिळते त्याला प्रसाद समजून स्वीकारा सर्वांचे चांगले होवो असा विचार करा निश्‍चितच आपले पण चांगले होते असे स्वामीजींनी सांगितले. या कार्यक्रमास शुभेच्छा देताना महसूल मंत्री नामदार विखे पाटील म्हणाले की या सुंदर अध्यात्मिक सोहळ्यास मला उपस्थित राहण्याचे भाग्य लाभले याचा मला आनंद वाटतो भक्ती आणि प्रसन्नतेचे महत्व रुद्र पूजा हे तत्व गुरुदेव श्री श्री रविशंकर यांनी अधो लिखित केले असून रुद्र पूजेमुळे अध्यात्मिक जीवनाचा आनंद तसेच सुख शांती लाभते राहाता येथे आर्ट ऑफ लिव्हींगच्या माध्यमातून सुनील शांताराम सदाफळ यांनी श्रावण  रुद्र पूजेतून राहाता व परिसरातील भाविकांना एकत्रित जोडण्याचे काम करून चांगले आध्यात्मिक कार्य केले आहे.सुनील सदाफळ व त्यांना सहकार्य करणारे सर्व सदस्यांचे नामदार विखे पाटील यांनी कौतुक केले. तर ह.भ.प.उद्धव महाराज मंडलिक यांनी यावेळी सांगितले की श्रावण मासात सोमवारी रुद्र पूजा ही भगवान शिवाजी सर्वात मोठी भक्ती मानली जाते. आऊट ऑफ लिव्हींग च्या माध्यमातून गुरुदेव श्री श्री रविशंकर महाराज यांनी शैक्षणिक अध्यात्मिक सामाजिक या कार्यांबरोबर ध्यान व प्राणायाम या सर्वच गोष्टींचा प्रसार देशासह जगभरात केल्याचे सांगताना सुनील सदाफळ यांनी राहाता येथे रुद्र पूजेच्या माध्यमातून एक चांगलं आध्यात्मिक कार्य श्रावण मासात सुरू केल्याचं कौतुक करीत सर्वच टीमचे कौतुक केले.

COMMENTS