Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

लाडक्या बहिणींना पैसे मिळण्यास सुरुवात ; डिसेंबरच्या हप्त्यासाठी 3500 कोटी वर्ग

मुंबई : विधानसभा निवडणुकीपूर्वी लाडक्या बहिणींना ऑक्टोबर आणि नोव्हेबर या महिन्याचे पैसे दिवाळीपूर्वीच महायुतीच्या सरकारकडून खात्यात टाकण्यात आले

एक अजित पवार ७२ तासांत सटकले.. तिथे शंभर अजित पवार भाजपाला कसे झेपणार?
एकीकडे टीका, दुसरीकडे एकाच गाडीतून प्रवास
विरोधकांचे चक्रव्यूह भेदून दाखवले : मुख्यमंत्री फडणवीस

मुंबई : विधानसभा निवडणुकीपूर्वी लाडक्या बहिणींना ऑक्टोबर आणि नोव्हेबर या महिन्याचे पैसे दिवाळीपूर्वीच महायुतीच्या सरकारकडून खात्यात टाकण्यात आले होते. त्यानंतर विधानसभा निवडणुकीत महायुती सरकारला लाडक्या बहिणींनी भरभरून मतदान केल्यानंतर पुन्हा एकदा महायुतीचे सरकार सत्तेवर आल्यापासून लाडकक्या बहिणींना पैसे कधी मिळतील याची प्रतीक्षा होती. मात्र ही प्रतीक्षा संपली असून, मंगळवारपासून लाडक्या बहिणींना पैसे मिळण्यास सुरूवात झाली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अधिवेशन संपल्यानंतर लाडक्या बहिणींना पैसे देवू असे आश्‍वासन दिले होते, त्यानुसार महिलांना 1500 रूपयांप्रमाणे सहावा हफ्ता मिळणार आहे. हप्ता देण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पाच हप्त्यांची रक्कम पात्र लाभार्थी महिलांच्या खात्यात वर्ग करण्यात आली होती. जुलै ते नोव्हेंबर पर्यंत 1500 रुपयांप्रमाणे 7500 रुपये महिलांच्या खात्यात जमा करण्यात आले होते. निवडणुकीपूर्वीच महिलांच्या खात्यात नोव्हेंबर महिन्याची रक्कम आली होती. आता डिसेंबरच्या हप्त्याची रक्कम मंगळवारपासून महिलांच्या खात्यात जमा होणार आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा डिसेंबर महिन्याचा हप्ता दोन टप्प्यात दिला जाणार आहे. पहिल्या टप्प्यात 2 कोटी 35 लाख महिलांना पंधराशे रुपये प्रमाणे डिसेंबरचा हप्ता मिळणार आहे. विधानसभा निवडणूक जाहीर होण्यापूर्वी अखेरच्या टप्प्यात महिला व बाल कल्याण विभागाकडे 25 लाख महिलांचे अर्ज आले होते. त्या अर्जांची स्क्रुटिनी राहिली असल्याने ती पूर्ण करुन या महिलांना देखील डिसेंबरचा हप्ता दुसर्‍या टप्प्यात दिला जाईल.

अर्थसंकल्पानंतर मिळणार 2100 रुपये
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरु केल्यानंतर महायुतीने मोठी घोषणा केली होती. विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या काळात महायुतीकडून लाडकी बहीण योजनेची रक्कम 1500 रुपयांवरुन 2100 रुपये करण्याची मागणी करण्यात आली होती. त्यानुसार 2100 रुपये कधीपासून मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. मात्र, डिसेंबरचा हप्ता 1500 रुपयांप्रमाणे मिळणार आहे. दुसरीकडे, मुख्यमंत्री फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपद स्वीकारल्यानंतर अर्थसंकल्पात याबाबत निर्णय घेतला जाईल, असे म्हटले होते. त्यानुसार अर्थसंकल्प सादर झाल्यानंतरच महिलांना 2100 रुपयांचा हप्ता मिळू शकणार आहे.

COMMENTS