Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

बेल्हेकर तंत्रनिकेतनमध्ये प्रथम व द्वितीय वर्षासाठी प्रवेश

नेवासा फाटा : भानसहिवरे येथील बेल्हेकर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट तंत्रनिकेतन मध्ये प्रथम वर्षासाठी व थेट द्वितीय वर्ष प्रवेश प्रक्रियेसाठी सुविधा केंद्रा

राज्य मार्ग ६५ कोपरगाव –पढेगाव-वैजापूर रस्त्यासाठी अडीच कोटी निधी मंजूर : आ. आशुतोष काळे
अल्पवयीन मुलीवर अत्याचार, आरोपीस जन्मठेपेची शिक्षा
परिमल निकम यांना कर्तव्यदक्ष प्रशासकीय अधिकारी पुरस्कार

नेवासा फाटा : भानसहिवरे येथील बेल्हेकर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट तंत्रनिकेतन मध्ये प्रथम वर्षासाठी व थेट द्वितीय वर्ष प्रवेश प्रक्रियेसाठी सुविधा केंद्रास महाराष्ट्र तंत्र शिक्षण मंडळाकडून शैक्षणिक वर्ष 2024- 25 करिता मान्यता मिळालेली आहे. यंदाच्या प्रथम व थेट द्वितीय वर्ष पॉलिटेक्निक प्रवेशासाठी 29 मे पासून ऑनलाईन प्रवेश सुविधा केंद्र सुरु करण्यात आले आहे विद्यार्थ्यांनी 29 मे ते 25 जून पर्यंत ऑनलाईन नोंदणी करावी तसेच कागदपत्रांची पडताळणी करून घ्यावी याची माहिती प्राचार्य एच. जे. आहिरे यांनी दिली.
पदवीकाच्या प्रथम वर्ष व द्वितीय वर्ष प्रवेशासाठी या सुविधा केंद्रात विद्यार्थ्यांना ऑनलाईन प्रवेश नोंदणी तसेच अभ्यासक्रमाची निवड करता येईल. विद्यार्थांना रजिस्ट्रेशन करणे, कागदपत्र पडताळणी करून देणे, ऑपशन भरणे यासाठी ज्ञानेश्‍वर पॉलिटेक्निक मध्ये सुविधा केंद्र ऋउ5248 सुरु झाले आहे,  तसेच येथे अद्ययावत संगणकीय साधन सामुग्री, पुरेशा क्षमतेने इंटरनेट सुविधा, प्रशिक्षित व योग्य संवाद साधणारा प्राध्यापक वर्ग इत्यादी बाबी आहेत. विद्यार्थिना याकेंद्रामार्फत त्यांचा कल आणि सध्या मागणी असलेल्या पदविका अभियांत्रिकी अभ्यासक्रमाचे सखोल मार्गदर्शन करण्यात येणार आहेत. तज्ज्ञ प्राध्यापक वर्गमार्फत जातीनिहाय संवर्गनुसार आवश्यक कागदपत्रे या संदर्भात सखोल माहिती येथे मिळणार आहे. राज्य माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत करण्यात येणार्‍या अंतर्गत गुण मूल्यमापनाचा आधारे प्रवेश देण्यात येणार आहे. दहावीचा निकाल जाहीर झाल्याने ऑनलाईन पद्धतीने नोंदणी करताना आसन क्रमांक अनिवार्य असेल. पॉलिटेक्निक प्रवेशासाठी कुठल्याही प्रकारची सी.ई.टी. परीक्षा नसेल इच्छुकांनी बेल्हेकर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट तंत्रनिकेतन भानसहिवरे नेवासा येथे संपर्क साधावा. प्रवेशाकरिता सुविधा केंद्रामार्फत आवश्यक असणारे कागदपत्रे व इतर माहितीसाठीचे वेळोवेळी मार्गदर्शन करण्यात येईल याच विद्यालयामध्ये यंत्र अभियांत्रिकी, स्थापत्य अभियांत्रिकी, संगणक अभियांत्रिकी व इलेक्ट्रॉनिक्स अँड टेली कम्युनिकेशन इत्यादी शाखा 2009 पासून उपलब्ध आहेत. माहितीसाठी 8830443056 वर संपर्क साधावा

COMMENTS