यवतमाळ प्रतिनिधी - महसूल राज्यमंत्री असताना अनेक घोळ घालण्यात आले. शिवसैनिकांची कामे करण्यात आली नाही. त्याचा रेकॉर्ड आहे. त्यानंतर राठोड या

यवतमाळ प्रतिनिधी – महसूल राज्यमंत्री असताना अनेक घोळ घालण्यात आले. शिवसैनिकांची कामे करण्यात आली नाही. त्याचा रेकॉर्ड आहे. त्यानंतर राठोड यांना कॅबिनेट मंत्री पद मिळाले. मात्र, पूजा प्रकरण बाहेर आल्याने भाजप नेत्या चित्रा वाघ यांच्यामुळे राठोड यांना राजीनामा द्यावा लागला. खासदार भावना गवळी यांच्या मागे लागलेली ईडी ची पीडा दूर झाली. मंत्री राठोड, खासदार गवळी हे भाजप प्रेमी झाल्याने त्यांचे गुन्हे माफ झाले का ,असा सवाल माजी खासदार चंद्रकांत खैरे यांचा चित्रा वाघ यांना विचारला. शिव गर्जना यात्रे निमित्ताने यवतमाळ जिल्ह्यात आले असता त्यांनी मंत्री राठोड, खासदार गवळी यांच्यासह चित्रा वाघ यांचा समाचार घेतला.
COMMENTS