Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

संसदेतील खासदारांचे वर्तन..

भारतीय लोकशाहीला 75 वर्ष पूर्ण झाली असून, या लोकशाहीचा प्रगल्भ असा इतिहास आहे. या संसदेत अनेक संसदपटूंनी अभ्यासपूर्ण भाषणांनी आणि संसदीय आयुधांनी

पाक पुरस्कृत दहशतवाद  
वंचित ‘मविआ’ला बळ देणार का ?
निवडणूक आयोगाला चपराक

भारतीय लोकशाहीला 75 वर्ष पूर्ण झाली असून, या लोकशाहीचा प्रगल्भ असा इतिहास आहे. या संसदेत अनेक संसदपटूंनी अभ्यासपूर्ण भाषणांनी आणि संसदीय आयुधांनी सत्ताधार्‍यांची कोंडी केल्याचा इतिहास आहे. विरोधी पक्षनेत्यांचे भाषणे असो किंवा विरोधक खासदारांचे भाषणे ऐकण्यासाठी पंतप्रधान जातीने सभागृहात येत असल्याचे अनेक उदाहरणे पाहायला मिळतात. मात्र ही संसदेची गरीमा आता धुळीस मिळतांना दिसून येत आहे. भाजपच्या खासदारांनी काँगे्रस नेते राहुल गांधी यांनी धक्काबुक्की केल्याचा आरोप आहे. तर दुसरीकडे काँगे्रस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी देखील आपल्याला भाजपच्या खासदारांनी धक्काबुक्की केल्याचा आरोप आहे. यात भाजपचे एक खासदार जखमी झाले आहे, तर दुसरीकडे राहुल गांधी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वास्तविक पाहता संसदेतील वर्तन नेमके कोणत्या दिशेला सुरू आहे, याचा अभ्यास करण्याची खरी गरज आहे. तर दुसरीकडे मुंबईत देखील काँगे्रस आणि भाजपच्या कार्यकर्त्यांनी राडा घातल्याचे समोर आले आहे. खरंतर या काही घटनांचे पडसाद संपूर्ण देशभरात उमटतांना दिसून येत आहे, त्यातून देश अशांत करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे दिसून येत आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांविषयी अवमानकारक वक्तव्य केल्यानंतर काँगे्रसने आक्रमक पवित्रा पुकारत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमा संसदेत आणत जयभीमच्या घोषणा देत हा परिसर दोन दिवसांपासून दणाणून सोडला होता. त्यामुळे सत्ताधारी भाजप बॅकफूटवर गेल्याचे स्पष्टपणे दिसून येत होते. सदर आंदोलन केवळ संसदेच्या बाहेरच होत नव्हते, तर संपूर्ण देशभरात होत होते. त्यातच डॉ. आंबेडकरांविषयी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपचा किती विरोध आहे, याचे अनेक उदाहरणे यानिमित्ताने बाहेर येत असल्यामुळे भाजपची प्रतिमा मलीन होतांना दिसून येत होती. त्यानंतर संसदेत भाजपच्या खासदारांना धक्काबुक्की करण्यात आल्याचा आरोप झाला. खरंतर भाजपच्या खासदाराचे डोके फुटल्याचे दिसून येत आहे. मात्र खरंच राहुल गांधी यांनी धक्का दिल्यामुळे ते फुटले का? हा महत्वाचा प्रश्‍न आहे. राहुल गांधी यांनी संसदेत भाजपची कोंडी करण्यासाठी नेहमी आक्रमकपणा दाखवल्याचे दिसून येत आहे. त्यातच लोकसभेत प्रियांक गांधी या वायनाड मतदारसंघातून निवडून आल्या आहेत. त्या लोकसभेत पोहोचल्यामुळे काँगे्रसला आणखी बळ मिळाले आहे. त्यांनी आपल्या पहिल्याच भाषणात आपली छाप सोडली. त्यानंतर डॉ. आंबेडकरांविषयीच्या वक्तव्याने आणखी या गदारोळात भर पडली. खरंतर याप्रकरणी जे नाट्य सुरू आहे, सत्ताधारी आणि विरोधी पक्षाकडून त्यातून संसदेतील सभागृहाचे अवमूल्यनच होतांना दिसून येत आहे. भारतीय संविधानावर आपला देश उभा आहे, तो एकसंध आहे. ते केवळ संविधानामुळेच. त्यामुळे संविधानाचे गुणगान सुरू आहे. मात्र संविधान देशातील प्रत्येक व्यक्तील समजले पाहिले. त्या संविधानाची मूल्ये सर्वसामान्यांपर्यंत पोहोचली पाहिजे. देशाची एकता जर शाबूत असेल तर ते केवळ संविधानामुळे, याचा विसर सत्ताधार्‍यांनी पडू दिला नाही पाहिजे. त्यामुळे सत्ताधारी असो की विरोधक त्यांनी संविधान समोर ठेवूनच आपला कारभार केला पाहिजे. मात्र संविधानीक अस्त्राची मोडतोड करून, संसदीय आयुधे वापरण्याऐवजी असा रडीचा डाव खेळण्यात येत असेल तर, संसदेतील खासदारांची प्रतिमा मलीन होण्याचाच हा धोका आहे. रस्त्यावर राडा करण्यासाठी खासदार संसदेत येत नाही. त्यामुळे धक्काबुक्की कुणी केली, खा. राहुल गांधी यांचा रस्ता नेमका कुणी अडवला, त्यांना संसदेत जाण्यापासून कुणी रोखले, याचा शोध घेण्याची गरज आहे. याप्रकरणी सत्ताधारी आणि विरोधी खासदारांची एक संयुक्त समितीद्वारे या प्रकरणाची संपूर्ण चौकशी करण्याची गरज आहे. कारण अशा घटनांपासून संसदेची प्रतीमा मलीन होतांना दिसून येत आहे. लोकशाहीच्या रखवालदारांचे वर्तन हे अतिशय आक्षेपार्ह आहे. त्यातून सर्वसामान्यांनी नेमका काय बोध घ्यावा? असा सवाल उपस्थित होत आहे.

COMMENTS