शिराळा : प्राध्यापक कॉलनीत विविध गल्ल्यांच्या नाम फलकाच्या उद्घाटन प्रसंगी आयोजित कार्यक्रमात रणधीर नाईक व आ. मानसिंगराव नाईक. (छाया : आनंदा सुतार, ख
शिराळा : प्राध्यापक कॉलनीत विविध गल्ल्यांच्या नाम फलकाच्या उद्घाटन प्रसंगी आयोजित कार्यक्रमात रणधीर नाईक व आ. मानसिंगराव नाईक. (छाया : आनंदा सुतार, खुजगांव.)
शिराळा / प्रतिनिधी : माजी मंत्री शिवाजीराव नाईक यांचा राष्ट्रीवादीतील पक्ष प्रवेश होण्यापूर्वीच यशवंत ग्लुकोजचे चेअरमन रणधीर नाईक यांनी शिराळा येथील राष्ट्रीवादीच्या वतीने आयोजित विकास कामांच्या उद्ाटनास हजेरी लावून पुढील काही दिवसात होणार्या पक्ष प्रवेशाचे संकेत दिले. या कार्यक्रमामुळे माजी राज्यमंत्री नाईक यांच्या पक्ष प्रवेशा पूर्वीच राष्ट्रवादीची मेल सुसाट सुटल्याचे दिसून येत आहे.
शिराळा येथील प्राध्यापक कॉलनी येथे विविध गल्यांच्या नामफलकाच्या उद्घाटन प्रसंगी आयोजित कार्यक्रमात रणधीर नाईक व आमदार मानसिंगराव नाईक यांनी हजेरी लावली.
आ. मानसिंगराव नाईक म्हणाले, शिराळा येथील तोरणा ओढ्याच्या सौंदर्य वाढीचे प्रयत्न सुरु आहेत. त्यासाठी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी पाच कोटीचा निधी मंजूर केला आहे. भुईकोट किल्ल्यावर श्री. छ. संभाजी महाराजांच्या होणार्या स्मारकाचा आराखडा मंजुरीच्या अंतिम टप्प्यात आहे. चांदोली पर्यटन, संभाजी महाराज स्मारक यामुळे शिराळचे नाव पर्यटनाच्या नकाशावर ठळक दिसले पाहिजे. शिराळा विस्ताराची सुरवात प्राध्यापक कॉलनीने केल्याने शिराळ्याला शहराचा दर्जा मिळाला. या शहराला विविध कामासाठी 15 कोटीचा निधी आणला आहे.
रणधीर नाईक म्हणाले, शिराळा येथील महत्वाच्या असणार्या अडचणी दूर होत आल्या आहेत. शिराळा बंटी पाटील मित्र परिवार व नगरपंचायतीच्या पदाधिकार्यांनी प्रयत्न करून प्राध्यापक कॉलनी येथील प्रत्येक गल्लीत नामकरण फलक लावण्यासाठी पुढाकार घेतला. शिराळा तालुक्याला अनेक वेळा उपाध्यक्षपद मिळाले. परंतू अनेक वर्षाने चेअरमन पद आमदार मानसिंगराव नाईक यांना मिळाले आहे. त्यामुळे आपल्या तालुक्यातील शेतकरी व इतर संस्थाच्या विकासला त्यांचा मोलाचा हातभार लागेल.
प्रारंभी सांगली जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल मानसिंगराव नाईक व सांगली जिल्हा युवक अध्यक्षपदी विराज नाईक यांची निवड झाल्याबद्दल यांचा सत्कार करण्यात आला.
घन:श्याम आवटे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. यावेळी जिल्हाध्यक्ष विराज नाईक, माजी पंचायत समिती सभापती भगतसिंग नाईक, नगराध्यक्ष प्रतीभा पवार, नगरसेवक गौतम पोटे, माजी जिल्हा परिषद सदस्य महादेव कदम, विश्वासचे संचालक विश्वास कदम, यशवंत निकम, विश्वप्रतापसिह नाईक, पृथ्वीसिंग नाईक, विजयकुमार जोखे, बंटी पाटील, प्रा. सतिश माने, माजी नगराध्यक्ष सुनिता निकम, नेहा सुर्यवंशी, सूजाता इंगवले, सिमा कदम, संजय हिरवडेकर, दस्तगीर अत्तार, अजय जाधव, संजय जाधव, राजू निकम, बसवेश्वर शेटे उपस्थित होते. रफिक आत्तार यांनी आभार मानले, सुत्रसंचलन अॅड. विलास झोळे-पाटील यांनी केले.
COMMENTS