बीड प्रतिनिधी - बीड नगरपालिकेवर सध्या प्रशासक लागू आहे शहराच्या नागरिकांच्या मूलभूत सुविधा आणि नागरिकांच्या दैनंदिन जीवनातील समस्या जाणून घेवून
बीड प्रतिनिधी – बीड नगरपालिकेवर सध्या प्रशासक लागू आहे शहराच्या नागरिकांच्या मूलभूत सुविधा आणि नागरिकांच्या दैनंदिन जीवनातील समस्या जाणून घेवून त्या समस्यांचे निराकरण करणे हे नगर पालिकेचे कर्तव्य असते परंतु बीड नगरपालिका ही जेव्हा पासून प्रशासकाच्या हाती आहे तेव्हा पासून मात्र उलट होत असताना दिसत आहे, मुख्याधिकारी हे आठवड्यातील कित्येक दिवस हे कर्तव्यावर नसतात, आणि त्यांच्या पाठोपाठ अनेक अधिकारी आणि कर्मचारी ही अनुपस्थित असल्या कारणाने लोकांची कामे ही खोळंबली जात असल्याचे चित्र सध्या निर्माण झाले आहे , तशीच अवस्था शहराच्या अनेक समस्यां बाबत आहे, शहरातील अनेक भागात घाणीचे साम्राज्य पसरले असून अनेक भागांत पाणी पुरवठा हा सुरळीत नाही, शहरातील अनेक स्ट्रीट लाईट ह्या बंद असून त्याने शहरात अंधार पसरलेला आहे , सध्या रमजान महिना आणि रामनवमी हे दोन मोठे सन आहेत तरी या मुख्य प्रश्नांबाबत नगर पालिका प्रशासनाला गांभीर्य राहिलेले दिसून येत नाही या मुळे बीड नगर पालिका प्रशासनाला कोणाचे नियंत्रण राहिलेले नसून असे दिसते ,येत्या तीन चार दिवसात या तमाम समस्यांची सोडवणूक केली नाही तर आम्ही लोकशाही मार्गाने आंदोलन करू अशी तक्रार माजी नगरसेविका शेख बिस्मिल्ला बी पशामिया यांच्या माध्यमातून हाफिज अशफाक यांनी जिल्हाधिकारी यांच्या कडे केली आहे.
COMMENTS