बीड जिल्ह्यातील उच्च दाब वितरण प्रणाली आणि सौरपंपाबाबत बैठक घेणार – ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

बीड जिल्ह्यातील उच्च दाब वितरण प्रणाली आणि सौरपंपाबाबत बैठक घेणार – ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे

मुंबई : उच्च दाब वितरण प्रणाली आणि सौरपंपाबाबत बीड जिल्ह्यातील आमदारांची बैठक घेण्यात येईल असे ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी विधानसभेत सांग

प्रवरा डाव्या कालव्यांना पुरेशा दाबाने पाणी सोडण्याची मागणी
 ज्ञानगंगा अभयारण्यात झाले दोन बिबट्याचे दर्शन
दागिने पॉलिश करून देण्याचा बनाव करून पाच तोळे सोने लंपास

मुंबई : उच्च दाब वितरण प्रणाली आणि सौरपंपाबाबत बीड जिल्ह्यातील आमदारांची बैठक घेण्यात येईल असे ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी विधानसभेत सांगितले. बीड जिल्ह्यातील गावांचा प्रधानमंत्री कुसुम सौर पंप योजनते समावेश करण्याबाबतचा तारांकित प्रश्न विधानसभा सदस्य नमिता मुदंडा, प्रकाश सोळंके, बालाजी कल्याणकर यांनी प्रश्नोत्तराच्या तासात उपस्थित केला होता. तनपुरे म्हणाले की, प्रधानमंत्री कुसुम योजनेच्या मार्गदर्शक सूचनांनुसार डार्क झोन आणि ग्रे झोनमध्ये सौर कृषी पंप सरसकट अनुज्ञेय नाही. बीड जिल्ह्यासंदर्भात भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा यांच्याकडील यादीनुसार बीड जिल्ह्यातील केवळ 449 गावे सुरक्षित/अंशत: शोषित पाणलोट क्षेत्रात समाविष्ट होती. त्यानुसार कुसुम योजनेअंतर्गत कार्यवाही करण्यात आली. भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा कार्यालय यांच्या 15 सप्टेंबर 2021 रोजीच्या यादीनुसार बीड जिल्ह्यातील सुरक्षित/ अंशत: पाणलोट क्षेत्रात 1,371 गावे समाविष्ट होती. या गावांचा समावेश प्रधानमंत्री कुसुम सौर कृषी पंप योजनेअंतर्गत करण्यात आला आहे. तसेच 15 सप्टेंबर 2021 रोजीच्या यादीनुसार केज तालुक्यातील 122 गावांचा प्रधानमंत्री कुसुम सौर कृषी पंप योजनेअंतर्गत समावेश करण्यात आला आहे.

COMMENTS