बीड जिल्ह्यातील नागझरी या गावात चतुराबाई रामा वाघमारे या वृद्ध महिलांची स्वतः च्या मुलानेच केली फसवणूक, चक्क आईलाच जिवंत पणी मयत दाखवून जमीन हडप करू
बीड जिल्ह्यातील नागझरी या गावात चतुराबाई रामा वाघमारे या वृद्ध महिलांची स्वतः च्या मुलानेच केली फसवणूक, चक्क आईलाच जिवंत पणी मयत दाखवून जमीन हडप करून फसवणूक केल्याचा प्रकार घडला आहे.
नागझरी येथील चतुराबाई रामा वाघमारे यांचे पती 29/12/2017 मध्ये मयत झाले आहेत. त्यांना 6 मुले व तीन मुली आहेत.स्वतः चतुराबाई या जिवंत आहेत , वारसा हक्कामाणे त्यांची जमीन आई, च्या नावे व इतर बहीण, भावना मिळणे आवश्यक आहे.
परंतु अर्जुन रामा वाघमारे याने जमिनी पोटी स्वतःच्या आईला मयत दाखवून शंभर रुपयांचे भांडवल शपथ पत्र करून या ठिकाणच्या सानप नामक तलाठी यांना,
हाताखाली धरून जमीन स्वतःच्या नावे करून बळकावली असल्याचे चतुराबाई वाघमारे ,आणि त्यांच्या भावाने सांगितले असून याची रितसर तक्रार बीड जिल्हा अधिकारी ,व बीड पोलीस अधीक्षक कार्यालय यांना निवेदन देऊन तलाठी सानप , व अर्जुन वाघमारे यांच्यावर 420 चा गुन्हा दाखल करावा. आणि मला माझी जमीन देण्यात यावी.अशी मागणी करण्यात आली आहे.
अन्यथा माझ्यासह माझी दुसरी मुलं व मुली 11 ऑक्टोबरला बीड जिल्हा अधिकारी कार्यालयाच्या समोर आमरण उपोषण करणार असल्याचे सांगितले आहे.
COMMENTS