Beed :शरद जाधव यांचे अमृता नदीत जलसमाधी आंदोलन (Video)

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

Beed :शरद जाधव यांचे अमृता नदीत जलसमाधी आंदोलन (Video)

गेवराई ते चकलंबा, उमापूर,खळेगाव, पौळाची वाडी,यासह जवळपास चाळीस ते पन्नास छोट्या मोठ्या गावाला जोडणाऱ्या मार्गांवरील दळणवळणाचा महत्वाचा प्रश्न महत्वाच

Beed : गेवराई मध्ये निघाला सर्वपक्षीय संताप मोर्चा (Video)
शेतकरी संकटाच्या खाईत असताना लाखो रुपयाची उधळ पट्टी कशासाठी
Beed : श्री गुरु चंद्रशेखर शिवाचार्यांची रुद्र प्रशिक्षण पाठशाळा बहरली (Video)

गेवराई ते चकलंबा, उमापूर,खळेगाव, पौळाची वाडी,यासह जवळपास चाळीस ते पन्नास छोट्या मोठ्या गावाला जोडणाऱ्या मार्गांवरील दळणवळणाचा महत्वाचा प्रश्न महत्वाचा आहे.  अमृता नदी वरील पुल  अतिवृष्टीमुळे वाहून गेला आहे.पुलाच्या दुरुस्तीसाठी अनेक वेळा वेळोवेळी लेखी अर्ज देऊन  व गांधीगिरी पद्धतीने आंदोलन करून देखील या रस्त्याचा व पुलाचा प्रश्न मार्गी लागला नाही .   सार्वजनिक बांधकाम  विभागाने या आतापर्यंत केलेल्या पाठपुराव्याला केराची टोपली दाखवत साफ दुर्लक्ष केले आहे.त्यामुळे दिनांक 1 ऑक्टोंबर रोजी पौळाचीवाडी  येथील अमृता नदीवरील अतिवृष्टीने वाहून गेलेल्या पुलासाठी समाजिक कार्यकर्ते शरद जाधव यांनी जलसमाधी आंदोलन सुरू केले.

मात्र महसूल व पोलीस प्रशासनाने वेळीच हस्तक्षेप करत शरद जाधव यांना जलसमाधी आंदोलन करण्यापासून रोखले .यावेळी शरद जाधव , मनोज शेंबडे, रामप्रसाद आहेर, आदी ग्रामस्थांकडून महसूल व पोलीस प्रशासनाला या वेळी निवेदन देण्यात आले.यावेळी महसूल विभागाचे खळेगाव सज्जा चे तलाठी बळीराम पवार पोलीस प्रशासनाचे एकशिंगे , पोलीस हेड कॉन्स्टेबल सोमनाथ कुलकर्णी ,अमोल अवसरमल,आदी उपस्थित होते.

COMMENTS