Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

Beed : जिल्हाधिकाऱ्यांनी केला चक्क ट्रॅक्टर मधून प्रवास……

दोन दिवसापूर्वी झालेल्या मुसळधार पावसामुळे पूल  ओलांडत असताना एक तरुण पाण्यात वाहून गेल्याची घटना गेवराई तालुक्यातील भोजगाव या ठिकाणी घडली होती..सुदर

आता रक्तासाठीही मोजावे लागते जादा शुल्क
गायरान जमिनीवरील अतिक्रमणावर कारवाई होणार
स्व. विनायकराव मेटे यांचा पुतळा बीड येथे उभारण्यात यावा या मागणीसाठी व्यापक बैठक संपन्न

दोन दिवसापूर्वी झालेल्या मुसळधार पावसामुळे पूल  ओलांडत असताना एक तरुण पाण्यात वाहून गेल्याची घटना गेवराई तालुक्यातील भोजगाव या ठिकाणी घडली होती..सुदर्शन संदिपान संत वय 34 राहणार भोजगाव तालुका गेवराई जिल्हा बीड हा तरुण रस्ता क्रॉस करत असताना पाण्यात पडला व वाहून गेला  दोन पूल अर्धवट आहे त्यातूनच ही दुर्घटना घडल्याने संतप्त गावकऱ्यांनी  गेवराई शेवगाव या राष्ट्रीय महामार्गावर प्रेत ठेवून चार तास ठिय्या आंदोलन केले होते.या घटनेनंतर दोन दिवसांनी स्वतः जिल्हाधिकारी राधा विनोद शर्मा यांनी भोजगाव ला भेट दिली.व मयत तरुणाच्या पत्नीला चार लाख रुपयांचा धनादेश दिला.व संबंधित पुलाचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्याचे प्रशासनाला सूचना दिल्या.यावेळी त्यांच्यासोबत उपविभागीय अधिकारी  नामदेव टिळेकर, प्रभारी तहसीलदार रामदासी यांच्यासह अनेक विभागातील कर्मचारी उपस्थित होते.

COMMENTS