Beed : आमदारांच्या प्रतिमेचा दुधाने अभिषेक

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

Beed : आमदारांच्या प्रतिमेचा दुधाने अभिषेक

पाटोदा तालुक्यातील  तांबा राजुरी ग्रामपंचायत अंतर्गत नेमाने वस्तिवरील दुध उत्पादक शेतकऱ्यांना ओढ्यातुन   चिखलवाट तुडवित प्रवास करून गावात दुध डेअ

त्या पत्रात आईने फाडला होता बोठेचा बुरखा
Crime Alert : पत्नीचा खून करून पती झाला फरार…
डॉ. अर्चना पाटील चाकूरकर भाजपच्या वाटेवर ?

पाटोदा तालुक्यातील  तांबा राजुरी ग्रामपंचायत अंतर्गत नेमाने वस्तिवरील दुध उत्पादक शेतकऱ्यांना ओढ्यातुन   चिखलवाट तुडवित प्रवास करून गावात दुध डेअरीवर जावे लागत आहे . लोकप्रतिनिधींकडून होणा-या दुर्लक्षाच्या निषेधार्थ आज   प्रतिकात्मक दुग्धाभिषेक  करण्यात आला. पाटोदा तालुक्याला आमदार बाळासाहेब आजबे ,आणि आमदार सुरेश धस, यांच्या रूपाने दोन आमदार लाभले असले, आणि यांनी कितीही  विकासाच्या गप्पा मारल्या तरी अद्याप वस्तिवरील ग्रामस्थांना रस्ते, वीज, पाणी आदि मुलभुत सुविधा उपलब्ध करून देण्यात ते असमर्थ ठरले आहेत .    वारंवार निवेदन देऊन कंटाळलेल्या नेमाने ग्रामस्थांनी सामाजिक कार्यकर्ते डाॅ.गणेश ढवळे यांच्या नेतृत्वाखाली लोकप्रतिनिधींच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक करून प्रतिकात्मक कर्तव्यदक्ष आमदारांचा  दुग्धाभिषेक लक्ष्यवेधी आंदोलनाने करण्यात आला.  यावेळी आंदोलनात नामदेव नेमाने, निवृत्ती नेमाने,बळीराम नेमाने, अशोक नेमाने आदि. सहभागी होते.

COMMENTS