Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

स्वप्न पडले म्हणून कोणी मुख्यमंत्री होत नाही : ना. अजित पवार

इस्लामपूर : जाहीर सभेत बोलताना ना. अजित पवार, व्यासपीठावर निशिकांत भोसले-पाटील, आ. इंद्रिस नायकवडी, आ. सदाभाऊ खोत यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी. म

माजी आमदार विश्‍वासराव आत्माराम पाटील यांचे निधन
आ. जयंत पाटील यांनी बजावला सहकुटुंब मतदानाचा हक्क
बंगालमध्ये दुर्गा विसर्जनावेळी बॉम्ब हल्ला; अनेकजण जखमी
इस्लामपूर : जाहीर सभेत बोलताना ना. अजित पवार, व्यासपीठावर निशिकांत भोसले-पाटील, आ. इंद्रिस नायकवडी, आ. सदाभाऊ खोत यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी.

महायुतीचे उमेदवार निशिकांत भोसले-पाटील यांच्या प्रचारार्थ सभा
इस्लामपूर / प्रतिनिधी : इस्लामपूरची बारामती करतो म्हणार्‍यांना तुम्ही सात टर्म संधी दिली. त्यांना फक्त मुख्यमंत्री पदाची स्वप्ने पडत आहेत. स्वप्न पडले म्हणून कोणी मुख्यमंत्री होत नाही. आता खोटे बोलणार्‍यांना सुट्टीवर पाठवण्याची वेळ आली आहे. निशिकांतदादांना मोठ्या मताधिक्यांनी निवडून द्या, असे आश्‍वासन राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले.
इस्लामपूर विधानसभा मतदार संघाचे महायुतीचे उमेदवार निशिकांत भोसले-पाटील यांचा मंगळवारी उमेदवारी अर्ज भरण्यात आला. यावेळी आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते. यावेळी आ. सदाभाऊ खोत, आ. इंद्रिस नायकवडी, माजी आ. भगवानराव साळुंखे, भाजपाचे सांगली जिल्हा अध्यक्ष दिपक शिंदे, प्रभाकर जमदाडे, भाजपाचे नेते सी. बी. पाटील, गौतम पवार, सत्यजित देशमुख, माजी जि. प. सदस्य भीमराव माने, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष केदार पाटील, रयत क्रांती संघटनेचे सागर खोत, माजी नगरसेवक विक्रम पाटील, पद्माकर जगदाळे, मन्सुरभाई मोमीन, जमील बागवान, माजी नगरसेवेक सनी मानकर, मनसेचे सनी खराडे प्रमुख उपस्थित होते.
ना. अजित पवार म्हणाले, महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास करायचा असेल तर राज्यात महायुती सरकार यायला हवे. खोटे निरेटिव्ह पसरून विरोधक समाजात तेढ निर्माण करत आहेत. करेक्ट कार्यक्रम करून कोणाचा होत नाही ते जनतेच्या हातात असते. आम्ही सत्तेवर आलो की लाडकी बहीण योजना बंद पाडणार असल्याचे विरोधक म्हणतात. महिला वर्गाला आर्थिक सक्षम करण्यासाठी ही योजना आम्ही केली आहे. वर्षाला तीन गॅस सिलेंडर मोफत देत आहोत. सरकार ते लाभार्थी, असा थेट लाभ देत असल्याने यात कोणताही भ्रष्टचार व्हायला जागा नाही. सरकारने कांदा निर्यात बंदी उठवली. गारपीट, अवकाळी ग्रस्त शेकर्‍यांना मदत केली. शेतकर्‍यांनी वीज माफी दिली. एक रुपयांत पीक विमा, दुधाला अनुदान हे सर्व चालू ठेवायचे असेल तर निशिकांतदादांना मोठ्या मताधिक्यांनी निवडून द्या.
आ. सदाभाऊ खोत म्हणाले, महायुती सरकारच्या माध्यमातून शेतकर्‍यांच्या हिताचे निर्णय घेण्यात आले. नदीजोड प्रकल्प राबवले गेले. 46 हजार कोटी रुपयांचे शेतकर्‍यांचे थकलेले बिल माफ केले. मोफत वीज देण्याचा निर्णय या सरकारने घेतला. काहींना मुख्यमंत्री पदाची स्वप्न पडायला लागल्यात. पण स्वप्न पडून काही होत नाही. त्यांना माहीत आहे ओटिंग केल्यावर दोन मते पडली होती.
निशिकांत भोसले-पाटील म्हणाले, तालुक्यातील लोकांना गुलामगिरतीतून मुक्त करण्यासाठी माझी उमेदवारी आहे. आजची रॅली ही माझ्या विजयाची नांदी आहे. अजितदादा तुम्ही या मतदार संघातील क्षारपड जमिनी सुधारण्यासाठी 93 कोटी दिले. पण हा निधी मागे घालवण्याचे काम येथील विद्यमान आमदारांनी केले. त्यांनी 35 वर्षात फक्त करामती करण्याचे काम केले. आमची रिकव्हरी जास्त असून ही आमचे 471 रुपये कुणाच्या तरी खिशात जात आहेत. दिवाळीतही त्यांना येथील शेतकर्‍यांची दुःखे दिसत नाहीत. कोरोना काळात ही त्यांनी माझे हॉस्पिटल बंद पडण्याचे काम केले. माझ्या 74 वर्षाच्या आईला अटक करण्याचा सूचना त्यांनी पोलिसांना दिल्या. मी जिवंत आहे, तोपर्यंत जयंत पाटील यांचे खुनशी राजकारण संपवल्या शिवाय मी गप्प बसणार नाही.
असल्या माणसाला मुख्यमंत्री करायचे का?
अजित पवार म्हणाले, निशिकांतदादांच्या उमेदवारीने काहींना धडकी भरली. आजपर्यंत त्यांना दाबून ठेवले गेले. निसर्गाचा नियम आहे. जेवढे दाबून ठेवले जाते. त्याच गतीने उसळी घेतली जाते. काहींनी सर्वोदय कारखाना घशात घातला. नेत्याने कार्यकर्त्याला कारखाना काढून द्यायचा असतो, खायचा नसतो. आमची रिकव्हरी कमी असून ही मला 3636 रुपये दर द्यायला परवडतो तर यांना का परवडत नाही. ते फक्त स्वतःच्या मालमत्तेत भर घालण्याचे काम करत आहेत. मग असल्या माणसाला मुख्यमंत्री करायचं का?.

COMMENTS