Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पावसाळ्यातील पूरस्थितीच्या आव्हानासाठी सज्ज रहावे; पालिका आयुक्तांचे निर्देश

मुंबई/प्रतिनिधी ः पर्यावरणीय बदलांमुळे प्रत्येक ऋतूवर या बदलांचा परिणाम दिसून येत आहे. त्यामुळेच मुंबईतील विविध यंत्रणांनी पावसाळ्याच्या काळात पू

मुंबईतील शाळकरी मुलं मधुमेह आणि रक्तदाबाच्या विळख्यात
उष्णतेमुळे आरोग्याची काळजी घेण्याचे महापालिकेचे आवाहन
मुंबई महानगरपालिकेत कर्मचार्‍यांची 20 टक्के बोनसची मागणी

मुंबई/प्रतिनिधी ः पर्यावरणीय बदलांमुळे प्रत्येक ऋतूवर या बदलांचा परिणाम दिसून येत आहे. त्यामुळेच मुंबईतील विविध यंत्रणांनी पावसाळ्याच्या काळात पूरपरिस्थितीच्या आव्हानावर मात करण्यासाठी सज्ज रहावे. पूरपरिस्थितीचा सामना करण्याची जबाबदारी बृहन्मुंबई महानगरपालिकेसह मुंबईतील सर्व यंत्रणांनी पावसाळ्याच्या कालावधीत योग्य पद्धतीने योगदान दिल्यास शहरावर येणारे संकट एकत्रित प्रयत्नाने टाळता येते. मुंबईसारख्या मेगासिटीमध्ये पूराचा धोका टाळण्यासाठी सर्व यंत्रणांनी यंदा पावसाळापूर्व कामांमध्ये चोख भूमिका बजावावी, असे आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक इकबाल सिंह चहल यांनी सर्व यंत्रणांना केले. महानगरपालिका आयुक्तांच्या अध्यक्षतेत आज पार पडलेल्या मान्सूनपूर्व – 2023 आढावा बैठकीत सर्व यंत्रणांनी पावसाळ्यातील पूराच्या आव्हानासाठी सज्ज रहावे, असे आयुक्त इकबाल सिंह चहल निर्देश त्यांनी यावेळी दिले.
येत्या पावसाळ्याच्या पार्श्‍वभूमीवर बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील विविध यंत्रणांमध्ये सुयोग्य समन्वय साधला जाण्याच्या दृष्टीने महानगरपालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांच्या मार्गदर्शनात आज बैठक संपन्न झाली. या बैठकीला अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) आश्‍विनी भिडे, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) आशीष शर्मा, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) पी. वेलरासू, बेस्ट उपक्रमाचे महाव्यवस्थापक लोकेश चंद्र, मुंबई उपनगर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले, मुंबई वाहतूक पोलीस सह आयुक्त प्रवीण पडवळ, प्रभारी अतिरिक्त आयुक्त (पश्‍चिम उपनगरे) रमेश पवार, महानगरपालिका आयुक्त कार्यालयाचे सह आयुक्त चंद्रशेखर चोरे, सामान्य प्रशासन विभागाचे सह आयुक्त मिलिन सावंत हे उपस्थित होते. यावेळी आपत्ती व्यवस्थापन विभागाचे संचालक महेश नार्वेकर यांनी संगणकीय सादरीकरण केले.
बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त कार्यालयात आयोजित मध्य व पश्‍चिम रेल्वे, राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद प्राधिकरण, भारतीय हवामान खाते, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, म्हाडा, मुंबई मेट्रो, राज्य शासनाचे सार्वजनिक बांधकाम खाते, बेस्ट, विविध विद्युत वितरण कंपन्यांच्या प्रतिनिधींसह विविध संस्थांचे प्रतिनिधी हजर होते. त्याचबरोबर बृहन्मुंबई महानगरपालिकेचे संबंधित सह आयुक्त, उप आयुक्त, सहाय्यक आयुक्त व विविध खात्यांचे प्रमुख देखील या बैठकीला उपस्थित होते.
उपनगर लोकलसेवा अव्याहतपणे सुरू रहावी, याची काळजी घ्या – रेल्वे आणि बृहन्मुंबई महानगरपालिकेने गतवर्षीच्या पावसाळ्यात अतिशय उत्तम समन्वय साधून काम केल्यानेच उपनगर लोकल सेवा अव्याहतपणे सुरू होती. रेल्वे हद्दीमध्ये मायक्रो टनेलिंग आणि कलव्हर्टच्या सफाईची कामे चांगली झाल्यानेच हे शक्य झाले. त्याचबरोबर पावसाच्या पाण्याचा संथ गतीने निचरा होणार्‍या ठिकाणी भूमीगत जल – साठवण टाक्यांची उभारणी केली. त्यामुळे सदर ठिकाणी रेल्वे आणि रस्ते वाहतूक थांबली नाही. यंदाही त्याच धर्तीवर उत्तम समन्वयाने काम करण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले. रेल्वे परिसरातील वृक्ष छाटणी मोहीम मे महिन्याच्या अखेरीपर्यंत पूर्ण करण्याच्या सूचनाही त्यांनी उद्यान विभागाला दिल्या.
यंदा नागरिकांना हवामानाच्या माहितीचे एसएमएस मिळणार – आपत्कालीन व्यवस्थापन विभागाकडून यंदाच्या पावसाळ्याच्या कालावधीसाठी नियंत्रण कक्ष तसेच हवामानाचे वेळोवेळी अलर्ट देणारी यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे.

COMMENTS