जळगाव प्रतिनिधी - चोपडा तालुका आणि शिरपूर तालुक्याच्या सीमेवरती अनेर नदी आहे या नदीवर धरण आहे. या धरणातून अनेर नदीमध्ये पाणी सोडण्यात यावे यासा
जळगाव प्रतिनिधी – चोपडा तालुका आणि शिरपूर तालुक्याच्या सीमेवरती अनेर नदी आहे या नदीवर धरण आहे. या धरणातून अनेर नदीमध्ये पाणी सोडण्यात यावे यासाठी चोपडा कृती समितीच्या वतीने गेल्या महिन्यात निवेदन देण्यात आले होते. परंतु त्याचा दखल न घेतल्याने आज बऱ्हाणपूर अंकलेश्वर हायवे वरील गलंगी गावा जवळ रास्ता रोको आंदोलन करण्यात आले आहे. अनेर नदीमध्ये पाणी सोडलं तर 16 गावातील पाण्याचा प्रश्न मिटतो त्यानंतर पशुधनाला शेतीला यांच्या फायदा होत असतो यासाठी अनेर नदीमध्ये पाणी सोडण्यात यावे. अशी मागणी करण्यात येत होती यावेळी तहसीलदार अनिल गावित व अभियंता पी. बी. पाटील अभियंता मोरे यांनी आंदोलन करते एस. बी पाटील व त्यांचे सहकाऱ्यांना आश्वासन दिल्याने आंदोलन तात्पुरते मागे घेण्यात आलेले आहे. या रास्ता रोको आंदोलनामुळे वाहनांची दोन्ही साईडने कोंडी मोठ्या प्रमाणावर झाल्याने यावेळी पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता.
COMMENTS